जिम्नॅस्टिक्स राही पाखले ( भोईर जिमखाना) आमदार चव्हाण यांनी केले अभिनंदन


डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली येथील श्रवण स्पोर्ट्स अकादमी येथे झालेल्या ट्रॅम्पोलिन वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी निवड चाचणीत डोंबिवलीतील भोईर जिमखान्यातील जिम्नॅस्टिक्स राही पाखले  हिची निवड झाली आहे. आमदार रविंद्र चव्हाण यांनी राहीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.      पुरुष जिम्नॅस्ट- आदर्श भोईर – महाराष्ट्र (भोईर जिमखाना),राहुल नेगी एसएससीबीउदित चव्हाण – SSCBमनू मुरली – SSCB तर महिला जिम्नॅस्टमध्ये  राही पाखले – महाराष्ट्र(भोईर जिमखाना)यामीन शेख - आंध्र प्रदेशसिद्धी ब्रीद  - महाराष्ट्र (भोईर जिमखाना) यांची निवड झाली आहे. या स्पर्धेकरिता आंतराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक पवन भोईर यांनी विशेष मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली होती.

Post a Comment

0 Comments