भारत आणि जगासाठी, महाराष्ट्रात नवोन्मेषाला चालना देण्याप्रती बांधील असल्याचा बीएसव्हीने केला पुनरुच्चार

■आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले बीएसव्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट केंद्राचे उद्घाटन


कल्याण : भारत सीरम्स अँड वॅक्सिन्स (बीएसव्ही) या भारतातील आघाडीच्या बायोफार्मास्युटिकल कंपनीनेऐरोली येथील जागतिक दर्जाच्या आरअँडडी केंद्राच्या माध्यमातूननवोन्मेष व शास्त्रशुद्ध संशोधनाला चालना देण्याप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचापुनरुच्चार केला. या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला बीएसव्हीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नवांगुळइंडिया बिझनेसचे सीओओ विश्वनाथ स्वरूप आणि आरअँडडीचे प्रमुख डॉ. जेबी जेकब उपस्थित होते.


 स्त्रियांचे आरोग्यअसिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नोलॉजी आणि क्रिटिकल केअर व इमर्जन्सी मेडिसिन या क्षेत्रांमध्ये अधिक चांगली निष्पत्ती देणारी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत जीवशास्त्रीय व जैवतंत्रज्ञानात्मक उत्पादने तसेच नावीन्यपूर्ण ड्रग डिलिव्हरी प्रणाली आणण्याचा प्रयत्न आरअँडडी केंद्र करेल.


  आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले, “आपल्या लोकांच्या आरोग्यसेवेबद्दलच्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून केल्या जाणाऱ्या संशोधनवर व नवोन्मेषावर महाराष्ट्राने सध्या जेवढे लक्ष केंद्रित केले आहेतेवढे आत्तापर्यंत कधीच केले नव्हते. आम्हाला बीएसव्हीसारख्या आमच्या एतद्देशीय जैवतंत्रज्ञान कंपन्यांचा अभिमान आहे. बीएसव्हीसारख्या कंपन्या गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्रात नवोन्मेष घडवत आल्या आहेत आणि जीवशास्त्रीय तसेच जैवतंत्रज्ञानिक क्षेत्रातील कितीतरी उत्पादने भारतात प्रथमचतयार करण्याचा मान मिळवत आल्या आहेत.


 बीएसव्हीने कोविड साथीदरम्यान लिपोझोमल अँफोटेरिसिन बीच्या उत्पादनासोबत केलेल्या सहयोगामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात तसेच कोविड साथीच्या व्यवस्थापनात खूप मदत झाली आहे. जनतेच्या आरोग्यसेवेच्या अपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही झटत आहोत आणि अशा काळात बीएसव्ही सध्या कोविड-१९ अँटिबॉडी विकासाचे काम करत आहे व भविष्यकाळातील कोविड लाटांशी लढण्यासाठी या अँटिबॉडीज  आपल्याला सज्ज करणार आहेतही बाब खूपच प्रोत्साहक आहे.''


          बीएसव्हीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नवांगुळ म्हणाले, “रुग्णांमध्ये निरोगी निष्पत्ती आणणाऱ्या आद्य नवोन्मेषांच्या माध्यमातून जीवन जिवंत करण्याच्या बीएसव्हीच्या उद्दिष्टाने आम्ही प्रेरित आहोत. आम्ही महाराष्ट्रात भारतासाठी आणि जगासाठी नवोन्मेष घडवत असतानाचआमच्या आरअँडडी केंद्रातील १०० हून अधिक वैज्ञानिक आमची आत्मनिर्भर भारताप्रती असलेली बांधिलकी दाखवून देत आहेत.  

Post a Comment

0 Comments