सुविधा मिळत नसल्याने १२०० सदनिका धारक आंदोलनाच्या पवित्र्यात

■विकासका विरोधात २६ जानेवारी रोजी छेडणार आमरण उपोषण..

  

कल्याण : मोहन ग्रुपच्या मनमानी विरोधात १२०० सदनिकाधारकांनी आंदोलनाचे बिगुल वाजवले असून मोहन ग्रुपच्या विरोधात गुन्हा दाखल करून, न्यायालयात जाऊन देखील २ वर्षापासून कोणताच न्याय मिळत नसल्याने अखेर २६ जानेवारी रोजी अंबरनाथ येथील सबर्बिया गृह संकुलाच्या मुख्यद्वाराबाहेर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.


       अंबरनाथ पश्चिमेतील फादर एग्नेल शाळेजवळ मोहन ग्रुप लाइफस्टाइल इमारतीमध्ये उल्हासनगरचे रहिवासी आणि समाजसेवक मनोहर वजीरानी यांनी सदनिका घेतली. ४ वर्षांपासून या इमारतीमध्ये सुविधांची कमतरता होती. ६२५ सदनिकाधारकांपैकी २०० सदनिकाधारक यामुळे त्रस्त होते. पाण्याच्या कमतरतेमुळे महिलांनी मोर्चा देखील काढला होता. मान्य केलेल्या जागेपेक्षा कमी जागा देणे, पाणी लिकेज, मेंटेनन्स चा हिशोब न देणे, सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी आवशक्य असलेले कागदपत्र न देणे अशा प्रकारचा त्रास या विकासकाने येथील रहिवाशांना दिला.


         समजवून देखील विकासक न ऐकल्याने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार करण्यात आली. तरी देखील काही उपयोग होत नसल्याने मनोहर वजीरानी यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.


       यानंतर २९ फेब्रुवारी २०२० रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दोन वर्षात संबंधीतांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे न्याय न मिळाल्याने २६ जानेवारी रोजी या गृहसंकुलातील १२०० सदनिका धारक आमरण उपोषणाला बसणारा असल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर वजीरानी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Post a Comment

0 Comments