मकर संक्रांतच्या शुभमु हूर्तावर चाकरमान्यांसाठी मनसेची बससेवा....

■करोना काळात मृत पावलेल्या घरच्यांना आणि अंध-अपंगाना मिळणार सेवा...


 

डोंबिवली ( शंकर जाधव )  करोना काळात सर्वांच्या दैनदिन जीवनावर परिणाम झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरु आहे.त्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आल्याने चाकरमान्यांना प्रवास करणे मुश्कील झाले आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेऊन मकरसंक्रांतच्या शुभमुहूर्तावर चाकरमान्यांसाठी बससेवा केली आहे.        त्यात विशेष म्हणजे करोना काळात मृत पावलेल्या घरच्यांना आणि अंध-अपंगाना मिळणार सेवा मिळणार आहे.डोंबिवली ते गुहागर अशी बससेवा मनसे गुहागर तालुका वाहतूक सेना चिटणीस विनायक दनदणे यांच्याकडून सुरु केलेल्या सेवेबद्दल डोंबिवलीकर आभार मानत आहेत.   


 

  डोंबिवलीतील खेडचिपळूणगुहागर तालुक्यातील चाकरमान्यांसाठी मनसे गुहागर तालुका वाहतूक सेना चिटणीस व सुंकाई ट्रॅव्हल्सचे मालक विनायक दनदणे यांच्या वतीने दररोज बससेवा सुरु केली आहे.डोंबिवली पूर्वेकडील मानपाडेश्वर मंदिरासमोर देवाची प्रार्थना करून श्रीगणेशा करण्यात आला.    मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मनसे आमदार परमो ( राजू )  पाटील व वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांच्या सहकार्याने व गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गणेश अरुण कदमडोंबिवली शहर संघटक योगेश पाटीलउपशहर अध्यक्ष राजू सदू पाटीलशहर सचिव अरुण जांभळेशाखाध्यक्ष महेश पांचाळवाहतूक सेना उपशहर अध्यक्ष अनिल वेलेकरउपचिटणीस संजय बाविस्कररस्ते आस्थापना शहर संघटक ओम लोकेउपप्रभाग संघटक फराकटे,सौरभ भामणकरहृषीकेश वळंजू पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.       डोंबिवलीतील खेडचिपळूणगुहागर तालुक्यातील चाकरमान्यांसाठी मनसेने सुरु केलेली बससेवा भविष्यात सर्वासाठी महत्वाची ठरणार असल्याचे यावेळी शहर सचिव अरुण जांभळे यांनी सांगितले. तर रस्ते आस्थापना शहर संघटक ओम लोके यांनी दनदणे यांच्या समाजसेवेबद्दल कौतुक केले. कल्याण-डोंबिवलीतील नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांनी डोंबिवलीतील कोकणवासीय नागरिकांना केले आहे.          यावेळी दनदणे म्हणाले,करोना जे मृत पावले अश्यांना या बससेवेत सवलत मिळणार आहेत. तर अंध आणि अपंगासाठीहि आम्ही विचार केला आहे.विशेष म्हणजे एसटी संपाच्या वेळी चाकरमान्यांना सेवा देणे हाच आमचा उद्देश आहे.गुहागर तालुक्यात शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय दरात जी सवलत सर्व एसटी बस मधून मिळते त्याच सवलतीत हि सेवा आम्ही देणार आहोत.

Post a Comment

0 Comments