ताडी विक्री दुकानावर होणार कारवाई


डोंबिवली ( शंकर जाधव ) पश्चिम डोंबिवलीतल्या कोपर गावाजवळील रेल्वे रूळालगत असलेल्या अण्णानगर झोपडपट्टीसमोरच्या ताडीचे विक्री दुकानात रसायनमिश्रित ताडी पिऊन सचिन पाडमुख (22) आणि स्वप्नील चौळके (30) या दोघा तरूण मित्रांचा बळी गेला. विष्णूनगर पोलिसांनी अड्ड्याचा चालक तथा ताडीमाफिया रवी बथणी याला परराज्यात पसार होण्यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत.



      त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 7/ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी ताडी विक्री चालकाला  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 478 नुसार नोटीस बजावली आहे.ही नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकाला या अड्ड्यावर कुणीही आढळून आले नाही.त्यामुळे पथकाने सदर गुत्ताच्या दरवाज्याला नोटीस चिकटवली. सदर ठिकाणी टपरी/गाळे/शेडचे अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. 



      सदर बांधकाम करण्याकरिता अधिनियमकोणताही नियमविनीयम किंवा उपविधी यांच्या कोणत्याही तरतुदीनुसार लेखी परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे नोटीस वजा आदेश प्राप्त झाल्यापासून दिवसांच्या आत सदर बांधकाम स्वतःहून काढून नष्ट करावे.


  

        अन्यथा निष्कासनासाठी लागणारा सर्व खर्च वसूल तर केला जाईलचशिवाय फौजदारी कारवाई करण्यात येईलअसेही या नोटीशीत बजावण्यात आले आहे. मात्र बजावलेली नोटीस स्विकारण्यासाठी ताडीमाफियाचा एकही हस्तक सदर अड्ड्यावर आढळून आला नाही.

Post a Comment

0 Comments