दुचाकी वरून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना सी.सी.टी.व्ही.च्या सहाय्याने केली अटक मानपाडा पोलिसांची कामगिरी


कल्याण : दुचाकी वरून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलीसांनी सी.सी.टी.व्ही.च्या आधारे पाठलाग करून अटक केले आहे. कल्याण तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षेत्रात चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे घडल्यानेसर्वसामान्य जनतेमध्ये त्यात विशेषतः महिलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते. महीलांना लग्नामध्ये मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यामध्ये त्यांच्या भावना (आस्था) गुंतलेल्या असतात. अशाच प्रकारच्या अनेक चैन स्नचिंग डोबिंवली शहरामध्ये झाल्यामुळे पोलीस विभागास गुन्हे उघडकीस आणणे व आरोपींना अटक करण्याचे एक मोठे आव्हानच आरोपींनी दिले होते.


चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी विविध पोलीस पथके तयार केली होती. या पथकांनी ज्या भागातुन चैन स्नैचिंग झाली आहे. त्या भागातील ५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी मानपाडा पोलीसांनी केली. चैन स्नॅचिंगचे  गुन्हे उघडकीस आणणेसाठी मानपाडा पोलीसांकडून अहोरात्र सर्वोतोपरी प्रयत्न चालु होते.


 मानपाडा पोलीस डोबिंवली शहरामधील  सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे आरोपीचा पाठलाग करत असताना चैन स्नैचिंग करणारे दोन इसम  विकेश रमाशंकर तिवारी आणि मनोजकुमार भारतसिंग ठाकुर दोन्ही रा. दावडीगांवडोंबिवली पुर्व यांना पकडुन त्यांच्याकडे चौकशी केली असता लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाल्याने त्यांनी एका बाइकवर वेगवेगळ्या ठिकाणी चैन स्नैचिंग करुन ते दागिने जबरीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


अटक आरोपींकडून ६ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३० हजार किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल व २४०० रुपयांचे दोन मोबाईल असा एकुण ७ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणात मानपाडाटिळकनगरडोंबिवली व विष्णुनगर पोलीस ठाणेचे हद्दीतील १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच त्यांचेकडे आणखी चौकशी सुरू असुन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे सपोनिरी. सुरेश डांबरेअविनाश वनवेपोहवा राजेंद्र कोळी खिलारे, विजयपोना महादेव पवारयल्लपा पाटीलअनिल घुगे, प्रविण किनरेदिपक गडगेभारत कांदळकर, दिपक जाधव ,पोशि महेंद्र मंझा यांच्या पथकाने केलेली आहे.

Post a Comment

0 Comments