फ आणि जे प्रभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपयुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी डोंबिवली (पूर्व) खंबाळपाडा येथील भोईरवाडी तलावाच्या बाजूला तलाव सुशोभिकरणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील बांधकामधारक प्रविण शांताराम नाईक यांच्या अनधिकृत आर.सी.सी. इमारतीच्या तळ मजल्याच्या फुटींगच्या चालू असलेल्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज केली. हि कारवाई ग प्रभागाच्या सहा.आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांच्या सहकार्याने व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारीमहापालिकेचे पोलीस अधिकारी यांच्या मदतीने १ पोकलेन, 1 जेसीबी, 3 ब्रेकर व 1 गॅस कटर यांच्या सहाय्याने सुरू करण्यात आली आहे.


त्याचप्रमाणे महापालिकेच्या जे प्रभागातही विभागीय उपआयुक्त डॉ. सुधाकर जगताप यांच्या  मार्गदर्शनाखाली जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्वचिकणीपाडा येथील तळ+1 मजल्याच्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर तसेच गणेशवाडीकर्पेवाडी येथील तळ +1 मजल्याच्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई नुकतीच केली. हि कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी व हातोडयाच्या मदतीने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments