"फ" प्रभागातील आर.सी.सी. इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई


कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली "फ" प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी डोंबिवली (पूर्व) येथील महालक्ष्मी कृपा इमारतीच्या बाजूला रवि शेट्टी यांचे तळ + 2 मजल्याच्या आर.सी.सी. इमारतीच्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली. 


         सदर कारवाई "ग" प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे, अधिक्षक अनिल इंगळे, दिनेश वाघचौरे,शंकर धावारे तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस, टिळक नगर पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व  १ पोकलेन, १ जेसीबीच्या  सहाय्याने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments