केडीएमसीच्या ग, आय, ह प्रभागातील अनधिकृत इमारतीच्या बांधका मांवर निष्कासनाची धडक कारवाई


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभागाचे सहा. आयुक्त संजय साबळे यांनी आडिवली ढोकळी येथील विकासक शेहबाज सरफराज अहमद व शाहिद बशीर शेख आणि विकासक दिनेश भगवान सिंह व नितेश बाळाराम भाने यांच्या नावे असलेल्या तळ +१ मजल्याच्या २ अनधिकृत इमारतींच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. 


        या इमारतींना यापूर्वीच नोटीसा बजाविण्यात आल्या असून या इमारती यापूर्वीच अनधिकृत घोषित करण्यात आलेल्या आहेत. ही निष्कासन कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, जी.एस.मोरे उप अभियंता बांधकामप्रभाग अधिक्षक मनोहर गोवेकरमहापालिकेचे पोलिस कर्मचारीमानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या मदतीने व १ पोकलेन यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


महापालिकेच्या ग प्रभागातही विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली  ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्वआयरे गाव येथील आर.सी.सी. बिल्डींगच्या प्लींथच्या चालू असलेल्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई आज केली. हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारीप्रभाग अधिक्षक शंकर धावारेमहापालिकेचे पोलिस कर्मचारी व १ जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.


त्याचप्रमाणे महापालिकेच्या ह प्रभागातही विभागीय उपआयुक्त डॉ. सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम तेलकोसवाडीजनगणमन शाळेजवळील बांधकामधारक जितेंद्र शिवराम म्हात्रे यांच्या तळ +४  मजली इमारतीच्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्‍कासनाची धडक कारवाई आज केली.


 हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी,महापालिकेचे पोलिस कर्मचारीविष्णुनगर पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस अधिकारी भालेराव व पोलिस कर्मचारी यांचे मदतीने व १ पोकलेन ५ ब्रेकरच्या सहाय्याने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments