भिवंडी तालुक्यातील पिळंझे ग्रामपंचायत क्षेत्रातील खाडीमशीन मुळे डोंगरला धोका, आदिवासी जमिनीवर अतिक्रमण, प्रांताधिकारी निद्रावस्थेत, काँग्रेसची कारवाईची मागणी..


भिवंडी दि 14 (प्रतिनिधी ) तालुक्यातील पिळंझे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वे नंबर 17 मध्ये अनधिकृत डोंगर फोडण्याचे काम सुरु असून येथील डोंगराला मोठा धोका निर्माण झाला आहे त्याच प्रमाणे येथील आदिवासी वस्तीमधील  नागरिकांना धमकावून त्यांच्या जागेत खाडीमशीन उभारली असून आदिवासी यांच्या जागेचे रक्षण होण्यासाठी काँग्रेस ठाणे जिल्हा कमेटीचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांनी थेट ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे .


         मात्र भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांच्यासह  त्यांची महसूल यंत्रणा मात्र निद्रावस्थेत असल्याचे पाहावयास मिळत आहे.पिळंझे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी यांच्या जमिनीवर जबरदस्तीने आदिवासी बांधवांना धमकावून त्यांच्या जागेत मायनिंग केले जात असून त्यामध्ये शेकडो ब्रास  गौण खनिज उत्खनन केले जात आहे त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तर डोंगराला धोका निर्माण झाला आहे.


          त्यामुळे आदिवासी बांधव हे उत्खनन थांबवण्यासाठी  यावर आवाज उठवत, न्याय मागत असल्याने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी तेथील दगड फोडण्याचे काम करणारी मांडळी कडून देण्यात येत असल्याने आदिवासी बांधव भयभीत झाले असून आमच्या आदिवासी वस्तीला पोलीस संरक्षण मिळावे आणि आम्हाला या त्रासापासून मुक्तता मिळवून आमच्या जमिनी आमच्या ताब्यात मिळाव्यात यासाठी येथील आदिवासी बांधवांनी काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस  पंकज गायकवाड यांच्याकडे आपल्या व्यथा मंडल्याने त्यांनी तात्काळ  आदिवासी बांधव त्यांच्यावरील अन्यायाच्या विषयी ठाणे  जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांना सविस्तर निवेदन दिले .


           असून यावर सर्व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यावर जिल्हाधिकारी यांनी  आश्वासन दिले आहे मात्र डोंगर फोडण्याचे काम सुरु असल्याने डोंगराला मोठा  धोका  निर्माण झाला असताना देखील  भिवंडी प्रांत अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांच्यासह  त्यांची महसूल यंत्रणा मात्र निद्रावस्थेत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनीच आता लक्ष देण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे ठाणे जिल्हा महासचिव पंकज गायकवाड यांनी प्रतिनिधिशी बोलताना सांगितले आहे..

Post a Comment

0 Comments