भिवंडीत पुन्हा एकदा कोरोना चा सामना करण्यासाठी पोलोस यंत्रणा सज्ज ,मास्क सॅनिटायझर चे वाहतूक पोलिसांनी सुरु केले वाटप...


भिवंडी दि 10 (प्रतिनिधी ) कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून आरोग्य विभागा सोबतच लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर चोवीस तास तैनात होती.तीच परिस्थिती पुन्हा कोरोना च्या तिसऱ्या लाटेत उदभवत असून त्यामुळे पोलीस  विभाग पुन्हा एकदा कामाला लागले असून भिवंडी तालुक्यातील कोनगाव वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी पुढाकार घेत आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांची सर्वप्रथम काळजी घेत त्यांचा सर्वसामान्यां नागरीकांशी जास्त संपर्क येत असल्याने वाहतूक पोलिसांना सॅनिटायझर मास्क चे वाटप करीत नागरिकांमध्ये जेव्हा वावरतात तेव्हा तुम्ही देखील तुमची काळजी घेत राहा.


           तसेच वाहन चालकांना देखील मास्क चे वाटप करून जनजागृती करून, रिक्षामध्ये जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा सोशल डिस्टंसिंग ठेवून आणि रिक्षामध्ये जेव्हा बसतात तेव्हा मास्क लावून बसणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे रिक्षाचालकाच्या पाठीमागे प्लास्टिकचे कव्हर लावून ठेवणे जेणेकरून कोरोना  चा फैलाव होणार नाही दोन चाकी व चार चाकी वाहन चालकांना अशा सर्व नागरिकांना वाहतूक पोलिसांकडून सूचना करण्यात आल्या आहेत .

Post a Comment

0 Comments