भिवंडीतील हेमा ढवण यांचा बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्काराने सन्मान


भिवंडी दि. १(प्रतिनिधी  ) भिवंडीतील हेमा संजय ढवण यांचा मेकअप क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके फॅशन आयकॉन लाईफस्टाईल बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईत एनिग्मा फैशन 'मैनेजमेंट आणि स्नेहा फॅशन फ्यूजन द्वारा आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी हेमा यांना सन्मानित करण्यात आले आहे. 


         या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेता नील मोटवाणी, मिसेस इंडिया यूनिवर्स रूपल मोहता , शमीम खान, तसेच सपना सिराकर, वेरोनिका वानिज, बॉलीवूड अभिनेत्री मालवी मल्होत्रा, मुस्कान शर्मा तसेच अभिनेता छोटू दादा सहित अनेक कलाकार उपस्थीत होते.            हेमा ढवण या एक गृहीणी असून घरची जबाबदारी सांभाळून त्यांनी फैशन डिजाइनिंगचा कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहून मेकअप क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने भिवंडी शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Post a Comment

0 Comments