कुणाल पाटील फाउंडेशनच्या साई पालखीला सुरवात

 


कल्याण : कुणाल  पाटील फाउंडेशन, साईसृष्टी सेवा मंडळ आणि साईभक्त कुणाल पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने देशमुख होम्स-टाटा पॉवर ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा व पालखी सोहळ्याला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली पूर्व सिद्धिविनायक टाटा पॉवर हाऊसदेशमुख होम येथून शिर्डी अशी पायी पदयात्रा काढण्यात आली. सोमवारपासून सात दिवसीय साईपालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून गेल्या चार वर्षांपासून ही पदयात्रा सुरू असल्याचे साईसेवक नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले.


वाजत गाजत मोठ्या उत्साहात पालखीचे आगमन देशमुख होम्सपिसवली गावटाटा पावर या भागातून करण्यात आले. या पालखी सोहळ्यात सहभागी २५० साईभक्त दररोज ३० ते ४० किलोमीटर पायी चालत देशमुख होम ते शिर्डी हा प्रवास पूर्ण करतील.  या साईपालखी पदयात्रेचे आयोजन साई सेवक श्वेता कुणाल पाटील यांनी केले आहे.  पदयात्रेत १८ ते ५० वयोगटातील साईभक्त सहभागी होतात. साई पालखीसाठी समाजसेवक अनिल पाटील, राजन दुबे, नकुल  भोईर, कल्पेश भोईरमनीष पाटीलरोशन भोईरमनीष भोईर व अनेक युवा कार्यकर्ते व महिला भाविक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments