गणाई परिवाराचा "सावित्री जिजाऊ उत्सव" जल्लोषात सुरूकल्याण : "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" जयंतीनिमित्त गेले अनेक वर्षांपासून गणाई परिवाराअंतर्गत ३ जानेवारी पासून ते १२ जानेवारी जिजामाता जयंती पर्यंत "सावित्री जिजाऊ उत्सव" साजरे करत आली आहे. गावो गावीघरोघरीखेड्या पाड्यात प्रत्येकाने हा सण उत्सव म्हणून साजरे करावे शिक्षणाची ज्योत पेटवण्यासाठी अनंत यातना सहन करणाऱ्या माउलीला कोटी कोटी नमन केले पाहिजे. त्या संघर्षाची जाण पिढ्यानपिढ्या जिवंत राहावी म्हणून हा उत्सव साजरा व्हावा. असे गणाई संस्थापक किशोर गणाई यांनी सांगितले.


    आज समाजात स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात प्रभुत्व मिळवता येत आहे ते म्हणजे केवळ एका अश्या स्त्री मुळे जिने अशक्य अश्या कठीण काळात एक धाडसी पाऊल उचलले. आज असे एक क्षेत्र नसेल जिथे स्वतःच्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी स्त्रिया सक्षम नाहीत. हे सर्व शक्य  झाले ते केवळ "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले "मुळेच असे मत विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी व्यक्त केले.

  

      दगड गोळेचिखलशेणाचा मारा सहन करत शिक्षणाची पाटी समृद्ध करणाऱ्या साऊ ला नमन करत दर वर्षी गणाई परिवारा अंतर्गत ३ जानेवारी हा दिवस शिक्षक दिन म्हणून महारातष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात साजरा केला जातो असे विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा गणाई यांनी सांगितले.

  

           वाई सातारामाणगाव रायगड,पुणे दिवळे भोरवाशीमपालघर वसई विरारठाणेमुंबई ,कल्याणउल्हासनगरनवी मुंबई अश्या विविध ठिकाणी जाऊन विविध शाळा महाविद्यालयात शिक्षकांच्या भेटी घेऊन हा दिवस साजरा केला गेला. तसेच सर्व शिक्षक प्राध्यापक वर्गाचा या मोहिमेला पाठिंबा असल्याचे विद्यार्थी भारती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments