एस एस टी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर


कल्याण : एस एस टी महाविद्यालयात नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्तदान शिबीर सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे म्हणत एस एस टी महाविद्यालयातील अनेक होतकरू तरुणांनी आणि शिक्षकांनी यामध्ये उत्फुर्त सहभाग नोंदवला. इतकेच नाही तर इतर महाविद्यालयातील तरुणांनी तसेच परिसरातील इतर व्यक्तींनी देखील येथे रक्तदान केले. 


           एस एस टी महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून  प्रत्येक वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच जास्तीत जास्त रक्त जमा करण्यात एस एस टी महाविद्यालय कायमच पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. अशात आता कोरोना महामारी तसेच इतर गोष्टी लक्षात घेत यंदा ठराविक अंतर पळून रक्तदान शिबीर राबवले गेले. कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करत इथे प्रत्येक व्यक्तीला मास्क बंधनकारक होते. या कार्यक्रमात डॉ.जे सी पुरस्वानी यांच्यासह आय. क्यू. ए. सी समन्वयक डॉ. खुशबू  पुरस्वानी आणि एन. एस.एस विभागाचे जिल्हा समन्वयक जीवन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. 


           तसेच इथे रक्त दान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एस एस टी महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि  संस्थापक प्राचार्य डॉ.जे सी पुरस्वानी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देखल देण्यात आले आणि रक्त दान झाल्यावर अल्पोहार तसेच जेवणाची देखील व्यवस्था केली गेली. या शिबिरामध्ये तब्बल 100 पेक्षा अधिक  व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला. तसेच जमा झालेला रक्ताचा साठा पुढे सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.


         हे रक्त मुख्यतः सेंट्रल हॉस्पिटलमधील थ्यालेसेमिया  रुग्णांना देण्यात येते.  रक्तदान शिबीर सुरू असताना सेंट्रल हॉस्पिटलमधील सिव्हिल सर्जन सुधाकर शिंदे, उषा ससाणे, राजकुमार चव्हाण, हरीश बागडे, स्मिता धुमाळे, वत्सला शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिल तेलिंगे, प्रा मयूर माथूर , प्रा दिलीप आहुजा तसेच एन एस एस आणि डी एल एल इ स्वयं सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments