३१डिसेंबरच्या रात्री २० तळीरामांना दंड...२ लाख दंड रक्कम वसुली...


डोंबिवली ( शंकर जाधव ) ३१ डिसेंबरला पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करत दारू पिऊन पार्टी करणे नवीन नाही.त्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.म्हणूनच शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपासून निर्बंध लागू करण्यात आले आहे.३१ नियमाचे उल्लंघन करून दारू डोसून वाहन चालविणाऱ्या २० जणांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.या कारवाईत शासनाच्या तिजोरीत २ लाख रुपये दंडाची रक्कम जमा होणार आहे.


     रविवारी ३० डिसेंबर रोजी 'नो चालन डे' निमित्त डोंबिवलीत वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते  यांसह वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंमाबाबत जनजागृती व समुपदेश केले.त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.२०२० च्या ३१ डिसेंबरच्या तुलनेत २०२१ ला ३१ डिसेंबरच्या रात्री वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसले. ३१ डिसेंबरच्या दिवशी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी गस्ती, बंदोबस्त आणि नाकाबंदी करून नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई  करण्यात आली. 


        बंदोबस्त असताना पोलिसांनी ब्रेथ ऍनालायझर मशीनद्वारे संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.यात २०  दारू पिऊन वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.यात २ रिक्षाचालक आणि १८ दुचाकीस्वार आहे.कारवाईत १० हजार रुपये प्रत्येकी अशी दंडात्मक रक्कम आहे.
  

चौकट 

          हेल्मेट न वापरणारे 80 टक्के दुचाकीस्वार  ....
  डोंबिवलीतील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे वाहतूक पोलीस , स्थानिक पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्याकडून नियोजन केले जात आहे.


        परंतु डोंबिवलीत ८० टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याची वास्तविकता आहे.दुर्दैवाने अपघात घडल्यास दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्यास त्याच्या जीवितास कमी धोका असतो.परंतु याबाबत जनजागृती करूनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याचे नाहीत.

Post a Comment

0 Comments