अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सुरु


ठाणे , प्रतिनिधी  : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान चालू असून ठाणे शहरातील विविध भागात या सदस्य नोंदणीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे व कीमान 50 हजार सदस्य नोंदविण्याचे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवले असल्याची माहीती शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी दिली.


        अखिल भारतीय राष्ट्रीय पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर रोजी चालू करण्यात आली राज्यातील विविध जिल्ह्यात व शहरातही सदस्याची नोदणी करण्यात सुरुवात करण्यात आली असून ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी ठाणे महानगर पालिका प्रभाग क्रमांक 22 मधे महागिरी,खारटन रोड या परिसरातील चालू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेतला.


           या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,ठाण्यातील विविध भागात अशा प्रकारे बुथ टाकून काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहीम अभियान राबविण्यात येणार असून ठाण्यातून कीमान 50 हजार क्रियाशील सदस्य नोंदविण्यात येणार असल्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे प्रत्येक वार्डात टप्प्याटप्याने हे अभियान सुरू राहणार असून देशातील आताची परिस्थिती पाहता केंद्रातील भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आता उघडा पडू लागल्यावर जनता आता पुन्हा काँग्रेसचा विचार करू लागली आहे.


        म्हणूनच सर्वत्र काँग्रेस पक्षाच्या नोंदणीला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे ऑनलाईन पद्धतीनेही ही नोंदणी चालू करण्यात आली असून प्रत्येक बुथ स्तरावर या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम लवकरच चालू करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments