आनंद व्‍हीएस कुलकर्णी सन्‍मानित◆एनसीपीईडीपी- माइण्‍डट्री हेलन केलर अवॉर्डस् २०२१ मध्‍ये रोल मॉडेल आंत्रेप्रीन्‍युअर्स विथ डिसॅबिलिटीज अवॉर्डसह सन्‍मानित..


मुंबई, २ जानेवारी २०२२ : दृष्टिहीन चित्रपट निर्मात्‍यांचे नेतृत्‍व असलेले भारताचे पहिले व एकमेव प्रॉडक्‍शन हाऊस फ्लॉप फिल्‍म्‍सचे संस्‍थापक आनंद व्‍हीएस कुलकर्णी यांना नुकतेच एनसीपीईडीपी-माइण्‍डट्री हेलन केलर अवॉर्डसमध्‍ये रोल मॉडेल आंत्रेप्रीन्‍युअर्स विथ डिजॅबिलिटीज विभागांतर्गत सन्‍मानित करण्‍यात आले.


       रोजगार संधी निर्माण करत दिव्‍यांग व्‍यक्‍तींना सक्षम करण्‍याच्‍या प्रयत्‍नांना सन्‍मानित करण्‍यासाठी दरवर्षी हे पुरस्‍कार दिले जातात. यंदा या प्रख्‍यात पुरस्‍काराचे २२वे पर्व दिव्‍यांग व्‍यक्‍तींच्‍या आंतरराष्‍ट्रीय दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला व्‍हर्च्‍युअली आयोजित करण्‍यात आले.


         सर्व अडचणींशी लढा देत आनंद यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) या उत्‍साही आणि मागणी असलेल्या अभ्यासक्रमामध्‍ये मुंबई विद्यापीठात अव्वल स्थान पटकावले. चित्रपटनिर्मितीबद्दलची त्यांची आवड आणि समर्पण यामुळे सर्व अडचणींवर मात करत हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला. पदवी शिक्षणानंतर त्‍यांनी व्यावसायिक चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि त्‍यामधून मिळालेले यश दिसूनच येत आहे. 


        त्यांच्या उल्लेखनीय वाढीच्या प्रवासात त्यांनी नसिरुद्दीन शाहबोमन इराणीसलीम सुलेमान आणि शंकर-एहसान-लॉय यांसारख्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. त्यांनी शापूर मिस्‍त्री आणि अनु आगा यांसारख्या उद्योगातील लीडर्ससोबत देखील सहयोग केला आणि सेन्हाइसर, हर्ले डेव्हिडसन, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक व महिंद्रा ग्रुप अशा ब्रॅण्‍ड्सना उच्‍चस्‍तरीय साह्य केले. अचंबित करणारी बाब म्‍हणजे ते भारतनेपाळथायलंडव्हिएतनाम आणि तुर्कीमध्ये दोन आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसह सर्वात तरुण इंडियन लाइन प्रोड्युसर देखील आहेत.   


        आनंद यांनी कबूल केले आहे कीआपल्‍या दृष्टिदोषासंदर्भातील उणीव भरून काढण्यासाठी त्‍यांनी इतरांपेक्षा अधिक मेहनत घेतली. याव्यतिरिक्‍तत्‍यांना कौशल्ये व सर्वोत्तम-श्रेणीतील कामाची इतकी आवड होती की त्यांनी लेखनदिग्दर्शननिर्मिती आणि संपादन असे सर्व काम केले. तसेच त्‍यांनी संगीत व्हिडिओब्रँड-केंद्रित जाहिरातीस्वतंत्र चित्रपटांमध्ये काम केले आणि अखेरीस फ्लॉप फिल्म्स हा स्‍वत:चा उपक्रम सुरू केला. 


         त्यांनी गेल्या सहा वर्षांत १५० हून अधिक ग्राहकांसाठी ३५० व्यावसायिक चित्रपट बनवण्‍याचा विक्रम केला आहे. दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी मनोरंजन क्षेत्र अधिक स्वीकारार्ह आणि प्रवेशयोग्य बनवण्याची त्यांची इच्छा आहे. खरेतर, फ्लॉप फिल्म्ससह देखील त्‍यांचा चित्रपटनिर्मितीमध्‍ये सर्वसमावेशकता व समानता आणण्‍याप्रती काम करण्‍याचा आणि प्रतिभेवर कोणत्‍याही पूर्वग्रहाचा अडथळा येणार नाही असे भविष्‍य तयार करण्‍याचा प्रयत्‍न आहे.  


          हे लक्षात घेण्यासारखे आहे कीयावर्षी जगभरातील जवळपास १०० अर्जदारांनी एनसीपीईडीपी-माइण्‍डट्री हेलन केलर पुरस्कारांसाठी अर्ज केले आहेत. पीडब्‍ल्‍यूडीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणारे लोक आणि संस्थांसाठी हा पुरस्कार भारतातील एक प्रमुख मान्यता म्हणून ओळखला जातो. 


        या पुरस्कारांचे आयोजन भारतातील अग्रगण्य क्रॉस-डिसेबिलिटी अॅडव्होकसी संस्‍था नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल (एनसीपीईडीपी)कडून माइण्‍डट्री या जागतिक तंत्रज्ञान सेवा व डिजिटल परिवर्तन कंपनीसह केले जाते. पीडब्‍ल्‍यूडीला प्रोत्साहन देणे आणि इतरांना सामूहिक व सहयोगाने वाढ करण्यासाठी प्रेरित करणे हा एकमेव उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments