`शिवसेना` बनली त्या कुटुंबियांचा आधार...शिवसैनिकां कडून `संतोष वडापाव गाडी`


डोंबिवली ( शंकर जाधव ) पक्षासाठी संपूर्ण वेळ कामात झोकून देणाऱ्या एका शिवसैनिकाला करोनाने गाठले.यात त्या शिवसैनिकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.आपला पतीने आपले जीवन पक्षाला वाहिले आणि त्याच्या पश्चात आपले कसे होईल असा विचार कुटुंबियांच्या मनात येत होता.परंतु शिवसेना आपल्या शिवसैनिकाला कधीच विसरत नाही हे अनेक वेळेला सिद्ध झाले आहे.डोंबिवलीतील अशाच एक शिवसैनिकाच्या कुटुंबियांना शिवसेनेने आधार दिला. चव्हाण यांच्या कुटुंबीयांना शिवसैनिकांकडून `संतोष वडापाव गाडी` चालू करून दिली.

   

        डोंबिवलीतील ५६ वर्षीय संतोष श्रीपाद चव्हाण हे कट्टर शिवसैनिक होते. पक्षाच्या शिकवणीनुसार चव्हाण यांनी समाजसेवेत झोकून दिले होते.२०२० साली करोना काळात चव्हाण यांचा करोनाने मृत्यू झाला.त्यांच्या पत्नी आणि तरुण मुलगा यांच्या उदरनिर्वाह कसा होईल या विचाराने शिवसैनिक चिंतेत होते.शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशनुसार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतील विभागप्रमुख तुषार शिंदे यांसह अनेक शिवसैनिकांनी चव्हाण यांच्या कुटुंबियांना त्याच्या पायावर उभे करण्यास मदत करण्याचे ठरविले.


    चव्हाण यांची डोंबिवली पूर्वेकडील पु.भा.भावे सभागृहाजवळ वडापावची गाडी होती. ते वडापाव विक्रीवर आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते.मात्र मार्च २०२० साली राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर केल्याने त्याचे आर्थिक गणित बिघडले. यातही चव्हाण यांनी जनतेची सेवा सुरु ठेवली. अखेर त्यांचा करोनाने आजाराने मृत्यू झाला. तब्बल दोन वर्ष वडापावची गाडी बंद असल्याने चव्हाण यांच्यानंतर कुटुंबियांना आधार देण्यासाठी विभागप्रमुख शिंदे यांनी याचा ठिकाणी नवीन वडापाव गाडी तयार करून दिली. 


           इतकेच नव्हे तर या गाडीला `संतोष वडापाव गाडी` असे नाव दिले.शिवसैनिकांच्या या प्रयत्नाचे खासदार डॉ.शिंदे यांनी कौतुक केले.नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी चव्हाण यांची पत्नी रसिका चव्हाण यांना मदत करताना वडापाव गाडीच्या पहिल्या दिवशी माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, परीवहन समिती माजी सभापती संजय पावशे, उपशहरप्रमुख किशोर मानकामे, शाखाप्रमुख सुरेश परब,मिलिंद दुधवडकर, कार्यालयप्रमुख सतीश मोडक,सोपान पाटील,उपविभागप्रमुख श्रीकांत बिरमुळे,नितीन पवार जेष्ठ शिवसैनिक रमेश साळवी, केतकी पोवार आदि मान्यवर उपस्थित होते.


   चौकट

 मला अभिमान आहे माझे पती शिवसैनिक होते...

  आपल्या पतीच्या पश्चात आपले आणि मुलाचे कसे होणार ? यांची चिंता लागून राहिली होती.पण आमच्या पाठीशी शिवसेना उभी राहून आधार दिला. मी स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार मझ्या पतीने समाजसेवा केली. मला अभिमान आहे माझे पती अश्या पक्षाचे कार्यकर्ते होते , ज्याच्या पाठीशी शिवसेना पक्ष कायम राहतो.शिवसेना आमच्यासारख्या महिलेला जीवनात सन्मानाने जगण्यास मदत करते.

Post a Comment

0 Comments