"क" प्रभागातील झोझवाला बिल्डींग या अति धोकादायक इमारतीवर पाडकाम कारवाई


कल्याण :  केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली "क" प्रभागाचे सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी कल्याण पश्चिम येथील  पुष्पराज हॉटेलच्या मागे असलेल्या झोझवाला बिल्डींग या तळ+2  अतिधोकादायक इमारतीवर पाडकामाची धडक कारवाई मंगळवारी सुरु केली.  ही इमारत सुमारे ८० ते ९० वर्ष जूनी असून या इमारतीस यापूर्वीच अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. 


          या इमारतीस सन २०२१ पासून नोटीस बजावण्यात येत होती. झुझर  झोझवाला यांचेकडून इमारत पाडकामाचा खर्च म्हणून रुपये ८२,४४२/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. या  इमारतीची पाडकाम कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी,महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व १ पोकलन, १ जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments