भिवंडीत मल:निस्सारण उद्दचन केंद्रास स्थानिक नागरिकांचा विरोध, काम पाडले बंद ...


भिवंडी दि 14 (प्रतिनिधी )महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या भुयारी गटार योजने अंतर्गत मल:निस्सारण प्रकल्पाचे काम सुरू असून शहरातील वऱ्हाळ तलाव परिसरातील मानसरोवर फुले नगर या निवासी क्षेत्रात समुद्र सपाटी पासून 100 मीटर उंचीवर असलेल्या ठिकाणी उद्दचन केंद्र बनविले जात असून त्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होत असून शुक्रवारी मानसरोवर फुले नगर येथील महिला पुरुष यांनी एकत्रित होत .


           पोलिसांनी मोर्चे आंदोलन करण्यास मनाई असल्याचे सांगून ही संतप्त नागरीकांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चाने जात विरोध करीत येथील काम बंद केले त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या नागरीकांना समजावत त्यांनी पालिका प्रशासन यांच्या सोबत चर्चा करण्याचे सुचवीत येथील आंदोलन थांबविले.या आंदोलनात नगरसेवक श्यामजी अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते संदेश पाटील सह स्थानिक नागरिक उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments