गेल्या २७ वर्षाची परंपरा खंडित न करता आझाद मैदाना वरील भटके-विमुक्त तथा ओबीसींचा 'ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा' अखेर संपन्न...


ठाणे, प्रतिनिधी  :  गेल्या २७ वर्षापासून भटके-विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार, वंचित, उपेक्षित घटक, शेतकरी, कामगार, अधिकारी वर्ग, मागासवर्गीय विद्यार्थी, विधवा, निराधार महीला, पारधी समाज यांच्या  न सुटलेल्या  प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दर वर्षी '५ जानेवारी' रोजी आझाद मैदान याच ठिकाणी  भटके-विमुक्त तथा ओबीसींचे नेते, माजी खासदार, माजी आमदार मा. हरिभाऊजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार ऐकण्याकरीता हजारोच्या संख्येने एकत्रित येत असतो.


        मात्र यावर्षी मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच सरकारच्या वतीने जाहिर केलेल्या मार्गदर्शक तत्वे लक्षातघेता या 'ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा'चे आयोजन कोरोना नियमाचे पालन करत प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंबई मराठी पत्रकार संघात संपन्न झाला, तद्नंतर या मेळाव्याचे रूपांतर पत्रकार परिषदेत झाले.


        या प्रसंगी या मेळाव्याचे मार्गदर्शक, आरक्षण अभ्यासक, माजी खासदार, माजी आमदार हरिभाऊजी राठोड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण हे राज्य सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे गेल्याचा घणाघात केला, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण परत मिळवायचे असेल तर लवकरात लवकर इम्पेरिकल डाटा राज्य सरकारच्या वतीने गोळा करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.


    यावेळी खालील मागण्यांचे निवेदन राज्य  सरकारला सादर करण्यात आले.


१) स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे


२) क्रिमिलेयर संज्ञेमधून भटक्या-विमुक्त तथा बारा बलुतेदार यांना वगळण्यात यावे

३) क्रिमिलेयरची मर्यादा रु. ८ लक्ष वरून रु.१५ लक्ष इतकी करण्यात यावी.


४) ओबीसींसह मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे.


५) प्राध्यापक, सहप्राध्यापक यांच्यासाठीचे रोस्टर केंद्र सरकारने केलेल्या कायद्याप्रणे ठेवावे.


६) बारा बलुतेदारांना स्वतंत्र ४% आरक्षण देण्यात यावे.


याप्रसंगी मुंबईसह महाराष्ट्रातील खालीलप्रमाणे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


           श्री लालमणी राजभर (अध्यक्ष, राजभर समाज, महाराष्ट्र), डॉ अरविंद केशव तुंबरे कहार (राष्ट्रीय अध्यक्ष, ग्लोबल कहार समाज), श्री हरिदास महाराज गंगाखेडकर (राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय बंजारा क्रांतिदल), श्री. प्रकाशभाऊ राठोड (प्रदेश्याध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा क्रांतिदल), श्री मूर्तीभाऊ राठोड (प्रदेश कार्याध्यक्ष, रा. बं. क्रांतिदल), श्री नंदूभाऊ पवार (प्रदेश्याध्यक्ष, BBKD पक्ष), श्री जयकुमार राठोड (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा क्रांतिदल), श्री महेशजी भाट (सरचिटणीस, अ भा. भांतु समाज), श्री सुधीरभाऊ राठोड (ठाणे-पालघर शिवसेना संघटक,बंजारा समाज), श्रीमती सुनीता जाधव (बंजारा कामगार महिला सेना) इ इ नेतेमंडळी तसेच मुंबई आयोजक कमीटीचे सदस्य राजेश चव्हाण, रवी चव्हाण, अप्पा भालेराव अदी.मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments