अधिकृत प्रतिनिधीकडे पावती घेतल्याशिवाय बजाज फायनान्सचे हफ्ते भरू नका


■कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाची बजाज फायनान्स सोबत संयुक्त बैठक संपन्न


कल्याण : रिक्षा चालकांच्या बजाज फायनान्स रिक्षा कर्ज हप्ते रिकव्हरी पध्दत व इतर समस्या बाबत तक्रारी होत्या रिक्षाचालंकाच्यां तक्रारीचीं दखल घेऊन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे पाठपुराव्याने बजाज फायनान्स च्या वरिष्ठ अधिकारी यांची व कोकण विभागातील रिक्षा संघटना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अधिकृत प्रतिनिधीकडे पावती घेतल्याशिवाय बजाज फायनान्सचे हफ्ते भरू नका असे आवाहन प्रणव पेणकर यांनी रिक्षा चालकांना केले.


       बजाज फायनान्सचे रिकव्हरी कर्मचारी एक दोन हप्ते थकीत झाल्यानंतर दादागिरी करुन बेकायदेशीर रिक्षा जमा करतात. अवाजवी रिकव्हरी दंड व्याज लावला जातो. सुरुवातीला कोरोना पादुर्भाव लॉकडाऊन कालावधीत वाहतुक बंद असताना रिक्षा थकित कर्ज हप्ते सर्व अडचणी संदर्भात बजाज फायनान्सच्या आधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. कोकण विभागातील प्रत्येक शहर संघटना पदाधिकारी यांनी बजाज फायनान्सच्या रिक्षा कर्ज या बाबत रिक्षा चालकांना होणारा ञास कथन केला. 


        यावेळी बजाज फायनान्सचे जयेश भटुवळकर,  किरण जोशीस्वप्नील आढाव,  आशिष मिश्रासुजित लोखंडे आदी अधिकारी उपस्थित होते. उपस्थित बजाज फायनान्स च्या वरिष्ठ अधिकारी यांनी संघटना पदाधिकारी यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून रिक्षा कर्ज रिकव्हरी बाबतीत अडचणी दूर करण्याचे मान्य केले.


बैठकीचे सुञसंचालन संतोष नवले यांनी केले. सुरेश आँटो डिल जनरल मॅनेजर राजु कुभांर व बजाज फायनान्स अधिकारी यांचे जितु पवार यानी बैठक आयोजन केल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी निखिल चंदे शहापुर, बाळा शेलार वासिदं बाळा झोडगे पनवेलरविद्रं सिहं भुल्लररमेश सिहं चौहानभुषण वैराळकरबाळा भोईर टिटवाळा, शिवाजी पाटील, विजय काटकर मोहने, किशोर देशमुख बदलापुरकुमार मुदलियार, आशोक कलाल अबंरनाथउदय शेट्टीशेखर जोशी गजानन पाटीलविलास शेलारडोंबिवली, सुबल डेजाँन कॅलिमिनोनुर जमादारहरी भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments