तीन दुकानांना लागलेल्या आगीत अनेक प्राणी, पक्षी, मासे मृत्युमुखी


कल्याण : कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात दुकानांना लागलेल्या आगीमध्ये अनेक पक्षीप्राणी आणि माशांचा मृत्यू झाला. विविध पक्षीप्राणी आणि माशांच्या विक्रीचीच ही दुकाने होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.


कल्याण मुरबाड रोडवरून रामबाग परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर ही पक्षीससे आणि मासे विक्रीची गेल्या अनेक वर्षांपासून ३ दुकाने आहेत. या दुकानांमध्ये लव्हबर्डसकबुतरेससे आणि माशांची विक्री केली जायची. आज सकाळी साडे आठच्या वाजण्याच्या सुमारास या दुकानाना आग लागल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. 


अग्निशमन दल येईपर्यंत स्थानिकांनी आपल्या परीने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील अनेक पक्षीससे आणि माशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला.

 

तर घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. आणि त्यातही काही पक्षीससे माशांना जीवदान दिले. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत ठोस कारण समजू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमूळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments