नाभिक समाज संघटने कडून हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीबचा निषेध


डोंबिवली ( शंकर जाधव ) मुजफ्फर नगर येथील सेमिनार मध्ये हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब याने केस कापताना पाणी नसेल तर केसांवर थंकून केस कापा असा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हबीब याने अशी कृती केल्याने नाभिक समाज प्रचंड संतापलेला आहे. डोंबिवलीतील नाभी समाज संघटनेने हबीबचा जाहीर निषेध करून त्याच्या गैरकृत्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी असा संदेश दिला.


       यावेळी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राऊतसचिव मंगेश पोखळेखजिनदार बाळा पवारसहखजिनदार तुषार शिंदे,  विश्वस्त दशरथ चित्तेसोमनाथ वरपेसंतोष शर्माशैलेंद्र वखरेभरत भाहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. डोंबिवली पूर्वेकडील स.वा.जोशी शाळेजवळील संघटनेच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदविला.


           संघटनेचे अध्यक्ष राऊत म्हणाले, हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब याने असे कृत करून समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.हबीबवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे. तर सचिव पोखळे म्हणाले, नाभी समाजासाठी ग्राहक हा देवासारखा असतो.हबीब याने एका ग्राहकाचे केस कापताना त्याच्या डोक्यावर थुंकणे हे अपमानास्पद आहे.अश्या सेमिनारवर पोलिसांनी बंदी आणावी.

Post a Comment

0 Comments