अखेर त्या कमानीवर केडीएमसीची कारवाई

 


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपायुक्त डॉ.  सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ई प्रभागाचे  सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व सोनारपाडाशंकरानगर येथील बऱ्याच दिवसापासून संवेदनशील झालेली कल्याण शिळ रोड वरील मोठी कमान तोडण्याची कारवाई नुकतीच केली.


नांदिवली येथील मुख्य रस्त्यावरील ८४ शेड, ४ जोते व २ गाळ्यांचे  बांधकाम देखील निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. हि कारवाई अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी महापालिका पोलिस कर्मचारी व १  जेसीबी, १ पोकलेन२ कॉम्प्रेसर यांच्या सहाय्याने करण्यात आली. 


त्याचप्रमाणे विभागीय उपायुक्त डॉ. सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्वपुना लिंक रोड येथील चाळीतील चालू असलेले रुमचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई केली. हि कारवाई अनधिकृत  बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारीमहापालिका पोलिस इ.च्या सहाय्याने  करण्यात आली.


Post a Comment

0 Comments