केडीएमसी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी प्रभागात स्वच्छता अभियान राबवित नागरी समस्या घेतल्या जाणून


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांच्या  निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त कोपरे, पालिका सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कायापालट ( स्वच्छ्ता अभियानांतर्गत) नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर व   घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त कोकरे यांनी आज कल्याण पूर्वकडील भागाची पाहणी केली. तसेच  स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी या भागातील विकास कामाचा आढावा घेतला.


              कल्याण तिसगाव नाका ,मंगल राघो नगर, 
तिसगाव नाकारोड वॉर्ड ८९ जगतापवाडी, व न्यू जिम्मी बाग येथील रस्त्याच्या कडेला तुंबलेली गटारे,अनधिकृत बांधकामे, कचऱ्याचे ढीग, रस्त्याच्या आड येत असलेली स्टॉल्स यावर कारवाई  करण्याचे आश्वासन देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.  


             सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी गटारी साफसफाई  स्वतः हजर राहून करून घेतल्या. यावेळी कचरामुक्त सोसायट्या निर्माण करण्यासाठी नागरिकांनी जागृत असणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कल्याण पूर्वेकडील नागरिकांच्या समस्याचे निरसन केले. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांनी ही चांगला प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments