शारदा मंदिर शाळेतील १०० विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

 


कल्याण, प्रतिनिधी  : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. याच अनुषंगाने कल्याण पश्चिमेतील १५ ते १८ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. याठिकाणी विद्यार्थ्यांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करून सामाजिक अंतर पाळून लसीकरण करण्यात येत होते. 


         यानंतर विद्यार्थ्यांना काही वेळ बसवून मगच सोडण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार १५ ते १८ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात पुढील निर्देश आल्यानंतर उर्वरित विद्यार्थ्याचे लसीकरण करण्यात येईल असे शारदा मंदिर शाळेतील शिक्षक राजाराम पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments