रूटरची सीरिज ए फेरीत २५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी


मुंबई, १४ जानेवारी २०२२ : रूटर या भारतातील आघाडीच्या गेम स्ट्रीमिंग आणि ई-स्पोर्टस् प्लॅटफॉर्मने, लाइटबॉक्स, मार्च गेमिंग आणि ड्युआन पार्क व्हेंचर्स यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सीरिज ए निधीउभारणी फेरीतून २५ दशलक्ष डॉलर्स (१८५ कोटी रुपये) उभे केले आहेत. रूटरने आज ही घोषणा केली. नाइनयुनिकॉर्न्स, अॅडव्हांटेज, कॅपिटल-ए आणि गोल व्हेंचर्स यांनीही या फेरीत पूर्वीच्या गुंतवणूकदारांसह सहभाग घेतला. यांमध्ये लीड स्पोर्टस् आणि हेल्थ टेक पार्टनर्स यांचा समावेश होता.


     पीयूष कुमार आणि दीपेश अगरवाल यांनी स्थापन केलेला रूटर हा प्लॅटफॉर्म भारतातील गेमिंग विभागातील सर्वांत मोठी कंपनी म्हणून उदयाला आला आहे. प्लॅटफॉर्मचे ८.५ दशलक्ष मासिक सक्रिय यूजर्स असून डाउनलोड्सची संख्या ३० दशलक्षांहून अधिक आहे. यामुळे ऑक्टोबर २०२० पासून हे गुगल प्लेस्टोअरवरील ‘स्पोर्टस्’ विभागातील पहिल्या क्रमांकाचे अॅप आहे. कंपनी आपले स्ट्रीमर्स आणि ई-स्पोर्ट्स स्पर्धांच्या माध्यमातून, चार्ट-टॉपिंग गेम्स विस्तृतपणे कव्हर करते.


      यांमध्ये बीजीएमआय, फ्री फायर, व्हेलोरंट आणि कॉल ऑफ ड्युटीसह अन्य अनेक गेम्सचा समावेश होतो. सुमारे १ दशलक्ष अनन्यसाधारण यूजर्स रूटर प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला गेमिंग कॉण्टेण्ट तयार करतात आणि आपल्या गेमिंग व ई-स्पोर्टस् प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पुढील ५००,००० व्यावसायिक गेम स्ट्रीमर्सचा वर्ग उभारून भारतातील निर्मात्यांच्या (क्रिएटर) अर्थव्यवस्थेतील प्रमुख कंपनी होण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.


       रूटरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष कुमार म्हणाले, "“भारतातील वाढत जाणाऱ्या मोबाइल गेमिंग बाजारपेठेशी सुसंगती राखत, रूटरही गेल्या १८ महिन्यांपासून प्रचंड वेगाने वाढत आहे आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या समूहाने नव्याने केलेल्या गुंतवणुकीतून आमच्या कामावर


       शिक्कामोर्तब झाले आहे. आमच्या स्ट्रीमर्स समुदायाला प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणावर उलाढाल दिसत आहे. त्यामुळे आम्हाला गेल्या सहा महिन्यांत उत्पन्न वाढवण्याची संधीही मिळाली आहे. येत्या दोन वर्षांत रूटरला देशातील सर्वांत मोठी गेमिंग कंपनी करण्यासाठी, दीपेश आणि मी, आमच्या पाठीराख्यांच्या साथीने, उत्सुक आहोत.”

Post a Comment

0 Comments