भारताचा स्‍लीप कोच ड्युरोफ्लेक्‍स कडून वंचित मुलांना १.५ दशलक्ष तासांच्‍या झोपेची भेट

■''गिफ्ट ऑफ स्‍लीप' उपक्रमासह वर्ष २०२२ चे स्‍वागत, एनजीओंना ५४७ मॅट्रेसेस दान


राष्‍ट्रीय, १३ जानेवारी २०२२ : 'गिफ्ट ऑफ स्‍लीप' हा नववर्षाची भेट म्‍हणून वंचित मुलांना आरामदायी झोप देण्‍याकरिता आघाडीचा स्‍लीप सोल्‍यूशन्‍स ब्रॅण्‍ड ड्युरोफ्लेक्‍सचा अभूतपूर्व उपक्रम आहे. ब्रॅण्‍डने २०२१ मध्‍ये हा उपक्रम सुरू केला, जेथे त्‍यांनी गरजू मुलांना ३६५ मॅट्रेसेस भेट म्‍हणून देण्‍यासाठी दि बेटर इंडियासोबत सहयोग केला होता. याच उत्‍साहाचा वर्षाचा शेवट करण्‍याकरिता त्‍यांनी नववर्ष २०२२ च्‍या सुरूवातीला ५४७ स्‍लीप सोल्‍यूशन्‍ससह मॅट्रेसेस व पिलो (उशा) देत या थोर कार्याला अधिक पुढे नेले. 


        आशादायी भविष्‍यासाठी मुलांना आरामदायी व पुरेशी झोप मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी, तसेच ते नववर्षाची सुरूवात आनंदात करतील या खात्रीसाठी हे स्‍लीप सोल्‍यूशन्‍स तामिळनाडू व महाराष्‍ट्रातील एनजीओंना भेट म्‍हणून देण्‍यात आले. ड्युरोफ्लेक्‍सने या अद्वितीय उपक्रमासाठी परोपकारी सहयोगी दि बेटर इंडियासोबतचा सहयोग कायम ठेवला.


        पुरेशी झोप ही तरूणांची वाढ व विकासासाठी आवश्‍यक आहे. म्‍हणून १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांवर लक्ष्‍य करत ड्युरोफ्लेक्‍सने हौसूरमधील शांती भवन रेसिडेन्शियल स्‍कूल, पुण्‍यामधील माऊली बालक आश्रम आणि मुंबईतील आफ्टर केअर होम यांना मॅट्रेस दान केल्‍या. तसेच उत्तम झोप देणारा 'गिफ्ट ऑफ स्‍लीप' उपक्रम चांगली रोगप्रतिकारशक्‍ती, शिक्षण व बुद्धीसह त्‍यांचे एकूण आरोग्‍य सुधारण्‍यामध्‍ये देखील मदत करेल. 


       ड्युरोफ्लेक्‍सने त्यांच्‍या ग्राहकांना या उपकमामध्‍ये सामील होण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या शुभेच्‍छा पाठवत गोड गेस्‍चर दाखवण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले. तसेच भारतभरातील त्‍यांच्‍या एक्‍स्‍पेरिअन्‍स सेंटर्समध्‍ये त्‍यांच्‍या शुभेच्‍छा गोळा केल्‍या. या हृदयस्‍पर्शी शुभेच्‍छा मुलांसह त्‍यांच्‍या स्‍लीप स्‍टेशन्‍सना शेअर करण्‍यात आल्‍या.


        या उपक्रमाबाबत बोलताना ड्युरोफ्लेक्‍सच्‍या मुख्‍य विपणन अधिकारी स्मिता मुरार्का म्‍हणाल्‍या, ''झोपमोड न होता ८ तासांपर्यंत पुरेशी झोप मिळणे मुलभूत गरज आहे आणि मुलांसाठी हे खूपच आवश्‍यक आहे. 'गिफ्ट ऑफ स्‍लीप' उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आमचा आपल्‍या देशाचे भविष्‍य असलेल्‍या या मुलांना आवश्‍यक आरामदायी झोप देण्‍याचा मनसुबा आहे. पुरेशी झोप मिळणे त्‍यांची सर्वांगीण वाढ व विकासासाठी महत्त्वाचे आहे. आम्‍ही भारतीयांना उत्तम झोप देण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाप्रती काम करत राहू.''  


        एक व्‍यवसाय म्‍हणून ड्युरोफ्लेक्‍सने नेहमीच समाजाचे ऋण फेडण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. २०२१ मध्‍ये त्‍यांनी वर्षभर बेंगळुरू, मुंबई, कोची, वेल्‍लोर, झारखंड, मध्‍यप्रदेश व राजस्‍थानसह देशभरात कोविड व फूड रिलीफ कार्याप्रती ३,००० हून अधिक मॅट्रेसेस दान केल्‍या.

Post a Comment

0 Comments