निम हकीम जान को खतरा, अशीच भाजपची गत ओ.बी.सी.नेते व शहर काॅग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांची टीका

 


ठाणे (प्रतिनिधी) -  ओबीसी एकीकरण समितीच्या कार्यक्रमात गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे पूर्ण भाषण न ऐकता ऐकीव भाषणावर भाजपवाले प्रतिक्रिया देत आहेत; जर,त्यांनी पूर्ण भाषण ऐकले असते तर असा विरोध केला नसता निम हकीम जान को खतरा, असा प्रकार भाजपचा आहे, असा टोला ओ.बी.सी. नेते व शहर काॅग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी मारला.


          ओबीसी एकीकरण समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सन्मानिय मंत्री डॉ. आव्हाड यांनी केलेले भाषण हे ओबीसी समाजामध्ये स्फूलिंग चेतवणारे होते.आगरी समाजाला मूळ प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने त्यांनी संख्येनुसार सत्तेत वाटा हवा, असे सुचविले होते. तर, इतर ओबीसींनी आपले राजकीय आरक्षण परत मिळवावे,यासाठी मैदानात उतरुन संघर्ष करावा, असे भाष्य त्यांनी केले होते.


          1988 ते 1990 च्या काळात आंबेडकरी समुदायाने मोठ्या संख्येने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी लढा दिला होता, हे सत्य आहे.त्यावेळी ज्यांनी मंडल आयोगाला विरोध केला.तेच आता ओबीसींचे पाठिराखे होण्याचा आव आणत आहेत. मंडल आयोगाच्या विरोधात दिल्लीत आंदोलने कोणी केली होती, हे भाजपने आधी जाहीर करावे आणि नंतरच डॉ.आव्हाडांवर टीका करावी,असेही सचिन शिंदे यांनी म्हटले आहे. 


          हा देश शिव, फुले,शाहू,आंबेडकरांचा आहे. या महापुरुषांचे विचार समानता प्रस्थापित करणारे होते.अन् समतेचा हा विचार मांडल्यामुळेच भाजपवाल्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांची ही पोटदुखीच आता बाहेर येत आहे,असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments