ताडीच्या ओवरडोसने डोंबिवली तील ट्राफिक वॉर्डनसह दोघांचा मृत्यू


डोंबिवली ( शंकर जाधव ) ताडी पिऊन ओवर डोस झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने डोंबिवलीतील ट्राफिक वॉर्डनसह दोघांचा मृत्यू मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी ताडीमाडी केंद्र चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

 

          मिळालेल्या माहितीनुसार,रवी बथनी असे गुन्हा दाखल झालेल्या ताडी माडी केंद्र चालकाचे नाव आहे.तर येथील ताडी पिऊन मृत्यू पावलेले स्वप्नील चाळखे (३०) आणि सचिन पाडमुख ( २२ ) असे तरुणाची नावे आहेत.यात स्वप्नील चाळके हा ट्राफिक वॉर्डनचे काम करत होता.स्वप्नील याचा पाय दुखत असल्याने दीड महिना कामावर नव्हता.डोंबिवली पश्चिमेकडील कोपर गाव येथील गावदेवी मैदान जवळील रेल्वे रूळाजवळ ताडी माडी केंद्र आहे.येथे हे दोघे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ताडी पिण्यासाठी गेले होते.


         काही वेळाने हे दोघे रेल्वे रूळाजवळील रस्त्यावर पडलेले आढळून आले.दोघांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मृत सचिन याचा भाऊ राहुल यांच्या फिर्यादीवरून ताडी माडी केद्र चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी रवी याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ताडी मध्ये शरीरास हानिकारक व अपायकारक द्रव्य मिसळल्याची तक्रार करण्यात आली आहे.आरोपीवर ३०४ कलमान्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल आहे.


    चौकट

 

        दारू बंदी खात्याचे डोंबिवली शहराकडे दुर्लक्ष असल्याचा आमदार चव्हाण यांचा आरोप हा प्रकार निंदनीय आहे. ताडी माडी केंद्रात दुकान रसायन मिश्रित ताडी लोकांना पिण्यासाठी दिली जाते.अश्या प्रकराची ताडी पिऊन डोंबिवलीतील दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. पूर्वी डोंबिवलीत ताडीची बरीच झाडे होती. मात्र आता अशी झाडे नसल्याने ताडी दुकानदार लोकांच्या जीवाशी खेळतात. हे सर्व पाहिल्यावर दारू बंदी खात्याचे डोंबिवली शहर व आजुबाजुकडील परिसराकडे लक्ष नसल्याचे दिसते.

Post a Comment

0 Comments