कल्याण तालुक्यातील वाळकस बेहेरे पुलाची दुरवस्था वाळकस - बेहरे पुलाला वाली कोण ? ग्रामस्थांचा सवाल


कल्याण (कुणाल म्हात्रे) कल्याण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क. ३ मुंबई - नाशिक जोडणाऱ्या वाळकस बेहेरे पुलाची दुरावस्था झाली असून भातसा नदीवरील हा पुला खचलेल्या अवस्थेत असल्याने कल्याण ग्रामीण भागातील वालकस- बेहरे पुलाला वाली कोण हा प्रश्न सध्या येथील नागरिक व ग्रामस्थ यांना भेड़सावत आहे.


जिल्हा परिषदेला पुलाविषयी तक्रार केली असताहा पुल भातसा धरण व्यवस्थापनाची जबाबदारी आहे असं कळविण्यात आले. तर भातसा धरण व्यवस्थापनाला विचारणा केली असतात्यांनी जिल्हा परिषदेने पुलाची जबाबदारी स्वीकारायला हवी अशी माहिती दिली. येथील अनेक सत्ताधारी जिल्हा परिषद- मध्ये प्रतिनिधीत्व करत आहेत मात्र  येथील  गावकऱ्यांना फक्त आश्वासनांचे गाजर दाखविले जात आहे. कोणत्याही असक्षम नेत्यामागे धावुन आपल्या समस्या सुटणार नाहीत हे गावकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे आणि आपापल्या नेत्यांना जाब विचारला पाहिजे असे आवाहन दिनेश बेलकरे यांनी वालकस बेहरे ग्रामस्थांना केले आहे.


कल्याण तालुक्यातील व राष्ट्रीय महामार्ग क३ मुंबई नाशिकला जोडणाऱ्या वाळकस बेहरे या गावचा पूल भातसा नदीला आलेल्या पूरात अचानक खचल्याने सध्या या पुलावरून धोका पत्करून बाळकस बेहरे ग्रामस्थ मार्ग क्रमस्थ करीत आहेत. या पूलाची उंची भातसई नदीपात्रापासून अगदी कमी असल्याने पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे हा पूल सतत पाण्याखाली असतो. २६ ऑगष्ट २०२० रोजी हा पूल अचानक खचल्याने ग्रामस्थ आपली वाहने जिव धोक्यात घालून नेत आहेत. साधारणपणे हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेल्या या दोन्ही गावांना राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे.


या ठिकाणी उंच मोठा पूल बांधावा अशी मागणी सातत्याने होत आलेली असताना हा पूल अचानक खचल्याने धोकादायक झाल्याने गरोदर स्त्रीयाअतितातडीच्या रूग्णंना दवाखान्यात नेण्यास कोणताच मार्ग उरलेला नाही. हा एकमेव मार्ग असून दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाही. हा पूल खचून धोकादायक झाल्याने शेतकरीभाजीपाला विक्रेतेदुधविक्रेते यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत असल्याची माहिती सामजिक कार्यकर्ते दिनेश बेलकरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments