ग्रामीण भागात विविध कार्ड बनविण्यासाठी शिबिराचे आयोजन


कल्याण : एस.एस.टी. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व घोटसई ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने  निशुल्क आधार  कार्ड बनवून देणेआयुष्यमान भारत योजना या अंतर्गत विमा काढून देणे तसेच नवीन पॅनकार्ड बनवून देणे व अद्ययावत करून देण्याचे शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण शिबिरात एकूण ७० ग्रामस्थांना ई-श्रम कार्ड३० ग्रामस्थांना पॅन कार्ड बनवून देण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत योजना व नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी नोंदणी करून घेतली.


हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानीएनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारेकार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल तेलंगेप्रा. मयूर माथुरमहाविद्यालयातील स्टाफ जितेंद्र पवार आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले. शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.


या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी घोटसई ग्रामपंचायत सरपंच संतोष धुमाळमाजी सरपंच काशिनाथ मगरउपसरपंच वनिता मगरकृषी उत्पन्न बाजार समितीकल्याणसंचालक योगेश धुमाळमाजी उपसरपंच योगेश मगरयांसोबत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वामन मगरसविता मगरसुयोग मगर, रोशनी धुमाळदया मगर, जागृती गायकवाड आणि मनोज पवार यांची उपस्थिती लाभली. 

Post a Comment

0 Comments