भिवंडीत सुप्रसिद्ध सियाराम ब्रँड च्या नवे विक्री केला जाणारा कोट्यवधी रुपयांचा बनावट कपडा साठा जप्त

 


भिवंडी दि 6(प्रतिनिधी ) तालुक्यात  असलेल्या गोदामां मध्ये मोठ्या प्रमाणावर मालाची साठवणूक करण्यात येत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट साहित्य साठविलेले आढळून येत असते .अशाच पद्धतीने सियाराम या सुप्रसिद्ध कपड्याच्या ब्रँड चे लोगो वापरून बनावट कपडा विक्री करण्यासाठी साठविलेले असताना कॉपीराईट कायद्या अंतर्गत कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचा कपडा जप्त करण्यात आला आहे.


           राहनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील अंजुरफाटा येथील धारणी आर्केट या ठिकाणी चौधरी टेक्स्टाईल्स नावाने असलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर सियाराम या सुप्रसिद्ध कापड उत्पादक कंपनीच्या लेनीन या ब्रँड चे कापड साठविल्याची माहिती इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन अँटी पायरेसी सेल चे रामजीत गुप्ता यांनी नारपोली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पो निरीक्षक मदन बल्लाळ यांना कळविली असता पोलिसांनी गोदमावर छापा मारला असता.


         त्या ठिकाणी बनावट कपड्याच्या किनारीवर सियाराम लेनिन असे ब्रँड लिहलेले 265 रुपये मीटर प्रमाणे विकला जाणार 1 कोटी 1 लाख 17 हजार 435 रुपयांचा 38 हजार 179 मीटर कपडा जप्त करीत गोदाम चालक जमाल अहमद कमरुद्दीन खान व गुरुचरण सतनाम सिंग या दोघां विरोधात फसवणूक व कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments