पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी डोंबिवली ग्रामीण मंडल कार्यालयात महामृत्युंजय जप


डोंबिवली (  शंकर जाधव )  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेबाबत खोडसाळपणा करण्यात आला. पंजाबचे कॉंग्रेस सरकार आणि पोलीस प्रशासनाने पंतप्रधान मोदी यांच्याबाबत योग्य ती दखल घेतली नाही. दरम्यान काही आंदोलकांनी पंतप्रधानांचा रस्ता अडवून त्यांच्या सुरक्षेवर आघात केला असा आरोप भाजपा करीत आहे.


          या घटना क्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य लाभो यासाठी डोंबिवली ग्रामीण मंडल  अध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली महामृत्युंजय जप आयोजित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अरिष्ट टळावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे भाजपा ग्रामीण मंडल कार्यालय, डोंबिवली येथे महामृत्युंजय जप व हवनाचा विधी संपन्न झाला. 


        यावेळी आमदार रविंद्र चव्हाण,  जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परब, युवा मोर्चाचे मितेश पेणकर, पुर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी व प्रभाग क्रमांक ८५ चे अध्यक्ष संतोष शुक्ला, प्रभाग क्रमांक ११२ च्या अध्यक्षा राजश्री पैजणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  उपस्थित सर्वांनी श्री महादेवाकडे नरेंद्र मोदींजींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments