गांधी - नेहरुंवर अपेक्षाहार्य विधान करणाऱ्या कालिचरण बाबावर अखेर १५ दिवसांनी गुन्हा दाखल


कल्याण , कुणाल म्हात्रे  : गांधी - नेहरुं बद्दल अपेक्षाहार्य  विधानासह  दोन  समाजात  जातीय  तेढ  निर्माण  करणारे  प्रवचन  कल्याणच्या कार्यक्रमात  देणाऱ्या कालिचरण  बाबा  विरोधात  अखेर १५  दिवसांनी  कल्याणच्या  कोळसेवाडी  पोलिस ठाण्यात   भादवी.   कलम २९५  (अ),  २९८,  १५३५०५  (ब),  अश्या  विविध  कलमासह  गुन्हे  दाखल  करण्यात  आल्याने  कालिचरण  बाबाच्या  अडचणीत  वाढ  झाली  आहे.


शिवप्रताप फाउंडेशन तर्फे श्री शिव प्रतापदीन” कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज रोडवर १० डिसेंबर २०२१ रोजी कालिचरण बाबाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पोलिसांचे नियम व आदेश डावलून कार्यक्रम केल्याप्रकरणी दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापनसाथी रोग कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून आदेशाचा भंग भादवि 241,188,269,270साथी रोग कायदा 23 ,4 ,आपत्ती व्यवस्थापन कायदा 51म. पो. आधी 1951 चे कलम 37(3)135 प्रमाणे आयोजक मयुरेश धुमाळ भैरव सिंग गुजरशुभम गोवेकरअमित घाडगेअक्षय बर्गेरूपेश परब ,रोहित परबनिलेश मानेगणेश धुमाळ व इतर १० ते १५ कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र  या कार्यक्रमात  गांधी - नेहरुंवर अपेक्षाहार्य विधानासह  दोन  समाजात  जातीय  तेढ  निर्माण  करणारे प्रवचन देणाऱ्या   कालिचरण  बाबावर त्यावेळी   कोणताही  गुन्हा पोलिसांनी  दाखल  केला  नव्हता.


       कल्याणच्या कार्यक्रमात महात्मा गांधींसह पंडित नेहरू विषयी अपेक्षाहार्य आणि वादग्रस्त विधान करत नथुराम गोडसेचा जयजयकार करणाऱ्या कालीचरण महाराजला छत्तीसगडच्या पोलिसांनी अटक केली. त्यानंतर  मात्र  कालीचरण महाराजांचा कल्याणच्या कार्यक्रमातील आणखी काही वादग्रस्त भाषणाचे  व्हीडिओ पोलिसांच्या हाती  आले आहेत. त्यातच समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणे केल्यामुळे कालीचरण महाराज सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत.  कल्याणातही महात्मा गांधीपंडित नेहरू यांच्या बद्दल अनुउदगार काढले होते.


कालीचरण महाराजांचे हे कल्याण मध्ये येऊन केलेले चिथावणीखोर भाषण हे दोन धर्मात तेढ निर्माण करून भविष्यात गृहयुद्ध भडकवणारे ठरू शकते. त्यामुळे अश्या देश तोडणारे भाषणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यामुळे कायद्याला अनुसरून शिक्षा झाल्यास कालीचरण सारख्या प्रवृतिला जबर बसेल म्हणून या बाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करून भारतीय संविधानातील मूल्य कशी जपली जातील हे पाहणे गरजेचे आहे.

 अशी लेखी तक्रार  राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा तक्रादार नोवेल साळवे यांनी  कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावर पोलिसांनी 15 दिवसांनी कालिचरण बाबावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तर पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कालिचरण बाबाचा ताबा घेण्यासाठी कल्याण पोलिसांचे  एक पथक पुणे येथे रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.

Post a Comment

0 Comments