मलंगगडाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध ! कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

■मंलगगडाकडे जाणाऱ्या रस्ते, पायऱ्यांच्या मार्गासह 15 कोटी 22 लाखांच्या कामाला सुरूवात..

डोंबिवली ( शंकर जाधव )  कोणत्याही कामाचे आधी कार्य़ादेश मिळवायचे आणि त्यानंतरच कामाचे भूमीपुजन करायचे ही कामाची पद्धत ठेवून गेल्या काही वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतो आहे. त्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये कामे दिसू लागले असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी  व्यक्त केले. 


       श्रीमलंगगडाच्या पायथ्यापासून ते फ्युनिकुलर ट्रेनपर्य़ंतच्या चार पदरी रस्त्याचे आणि गडावरजाण्यासाठी दगडी पायऱ्यांच्या कामाला मंगळवारी सुरूवात झाली. खा. डॉ.  शिंदे यांनी या कामाचे भूमीपुजन केले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील चार कामांचे भूमीपुजन मंगळवारी पार पडले. यावेळी बोलताना खासदार डॉ. शिंदे यांनी मलंगगडाचा सर्वांगिण विकास करण्याचे आश्वासन दिले.


       कल्याण लोकसभा मतदारसंघातील श्रीमलंगगड आणि परिसरात मंगळवारी विविध विकासकामांना खासदार डॉ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. यात हाजीमलंगवाडी ते फेनिक्युलर लोअर ट्रॉली स्टेशन पर्यंतचीचारपदरी रस्ता, बक्तारशाह बाबा दर्ग्यापासून श्रीमलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला घडीव दगडाच्या खांडकी पेव्हिंगच्या माध्यमातून पायऱ्या आणि त्याला सुरक्षा रेलिंग, आंबे गाव रस्त्यावर साकव आणि उसाटणे – बुर्दूल - नाऱ्हेण – पाली – चिरड – शेलारपाडा या रस्त्य़ाच्या कामाचा समावेश आहे.


        या कामांच्या माध्यमातून अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडआणि परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. मंगळवारी खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीतया कामांचे भूमीपुजन करण्यात आले. मलंगगड परिसराचा सर्वांगिण परिसराचा विकास केला जाईल असे आश्वासनयावेळी बोलताना खासदार डॉ. शिंदे यांनी दिले. यावेळी बोलताना, आम्ही कामाचे कार्यादेश मिळवून काम सुरूकरतानाच भूमीपुजन करतो. अन्यथा या भागात अनेकदा नारळे फुटले पण काम मात्र झाले नाही असेही ते म्हणाले.


         २०१४  च्या लोकसभा निवडणुकीवेळी या भागात फिरताना या भागातील गरजा ओळखून घेतल्या होत्या. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता भाऊसाहेब दांगडे यांनी आवर्जुन या भागाची माहिती घेत कामांना गती दिल्याचेही यावेळी डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यामुळेच लवकरच हाजीमलंगवाडी  आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न पहिलांद्याच सोडवला जाणार आहे. त्यासाठी ३८ कोटींचा निधी मंजर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यातआहे. 


          त्याचप्रमाणे लवकरच या भागातील रस्त्यांची कामे पूर्ण होऊन इथला प्रवास सुखकर होईल, असेही डॉ. शिंदे यांनीयावेळी सांगितले.  याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, अब्दुल बाबाजी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, बांधकाम सभापती वंदना भांडे, सुवर्णा राऊत, श्याम बाबू पाटील, तेजश्री जाधव, सुरेश पाटील, अशोक म्हात्रे, बदलापूरशिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments