विद्यार्थी सहायता प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांचा सन्मान


कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या "जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" या अभियानांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सिद्धार्थ विद्या मंदिर मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या माध्यमातून कल्याण मधील विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना कल्याणकर नारी गौरव या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले.


या सोहळ्यास संस्थेच्या सचिव शुभा गुप्ते अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी स्नेहा करपे (सहाय्यक उपायुक्त व क्रीडाधिकारी अतिरिक्त कार्यभारकल्याण डोंबिवली महानगरपालिका), डॉ. पूर्वा भानुशाली (वैद्यकीय अधिकारी तिसगाव नागरी आरोग्य केंद्र), सुजाता डांगे (मराठी अभिनेत्री), सुजाता बोरसे (मास्टर अॅथलीट आणि प्रेरक वक्त्या), रुपाली माने (वाहतूक उपशाखा कोळशेवाडी), रश्मी राऊत (मुख्य सेविका महिला व बालविकास प्रकल्प कल्याण)जोरवेकर (मुख्यसेविका) तसेच कल्याणमधील आशासेविका अर्चना जगतापतारा परदेशीवैशाली परदेशी यांना गौरविण्यात आले.


याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शेवाळे व ज्योत्स्ना चाळसे उपस्थित होत्या. विद्यार्थीनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रम यशस्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments