भिवंडीत कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आयुक्त स्वतः ऍक्शन मोड मध्ये ,हॉटेल वर कारवाई करीत केले सील..


भिवंडी दि 10 (प्रतिनिधी ) दिवसेंदिवस कोरोना चा कहर वाढत असताना भिवंडी शहरात ही मागील चार दिवस सतत रुग्ण संख्या शंभरी पार करीत आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे .
त्यामुळे कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः आयुक्त सुधाकर  देशमुख हे ऍक्शन मोड मध्ये आले असून स्वतः अधिकारी कर्मचारी यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनांवर कारवाई करण्यास सरसावले आहेत .


          आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सहाय्यक आयुक्त सुनील भोईर यांच्या पथका सह  वंजारपट्टी नाका येथील सुप्रसिद्ध हॉटेल बारादरी येथे स्वतः तपासणी केली असता तेथील कर्मचारी कामगार हे लसीकरण न केलेले आढळून आले तर 50 टक्के क्षमते पेक्षा अधिक ग्राहक त्याठिकाणी बसलेले आढळून आल्याने आयुक्तांनी हॉटेल वर दंडात्मक कारवाई करीत हॉटेल सील केले .


          तर त्या सोबतच अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे ,उपायुक्त दीपक झिंजाड सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या प्रभागात कारवाईस सुरवात करीत अनेक हॉटेल्स वर दंडात्मक कारवाई सोबत हॉटेल सील करण्याचा धडाका लावला ज्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

0 Comments