प्लास्टिकच्या कारवाईतून केडीएमसीने केला ५० हजारांचा दंड वसूल

■पालिकेच्या ग आणि क प्रभागात प्रतिबंधित प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई...


कल्याण : प्लास्टिकच्या कारवाईतून केडीएमसीने ५० हजारांचा दंड वसूल केला असून पालिकेच्या ग आणि क प्रभागात प्रतिबंधित प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई करण्यात आली.


महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ३ जानेवारी ते ९ जानेवारी या दरम्यान "प्लास्टिक निर्मुलन" सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने आज ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक नरेंद्र धोत्रे व आरोग्य निरिक्षक सुर्वे यांचे समवेत डोंबिवली पूर्व उत्कर्ष चायनिज सेंटरसचिन स्नॅक्स बारबिस्मिला बिर्याणी कॉर्नर सेटर इ. यांच्याकडील ४ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांना १५ हजार रुपयांचा दंड आकारला.


महापालिकेच्या क प्रभागातही सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक योगेश जगतापआरोग्य निरिक्षक संदीप खितमतरावदत्तराम सावंतजगन्नाथ वड्डे यांच्या समवेत कल्याण पश्चिम येथील सावंत स्नॅक्समधुरम डेअरी,बिकानेर स्वीट्ससद्गुरु कृपामे साईबाबा किराणा स्टोअर्स इ. यांच्याकडील ८.५  किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांना ३५ हजार रुपयांचा दंड आकारला.

Post a Comment

0 Comments