भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ठाणे जिल्हा परिषदेचा उपक्रम

■ग्रामीण भागातील १०० गावांमध्ये रथाच्या माध्यमातून स्वच्छते विषयक  जनजागृती ...


ठाणे दि.३ जाने ( जि.) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमातर्गत  ग्रामीण भागातील १०० *गावांमध्ये स्वच्छते  विषयक* कामांची जनजागृती करणारा रथ फिरणार आहे. सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रथ मार्गस्थ करण्यात आला. 


          यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय निमसे, समाज कल्याण समिती सभापती प्रकाश तेलीवरे, अंबरनाथ पंचायत समिती सभापती अनिता निरगुडा, तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश विशे, रमेश पाटील, कैलास जाधव त्याचबरोबर  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


         जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  गावोगावात फिरणाऱ्या रथाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त प्लस या संकल्पनेतून गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच शुन्य कचरा निर्मिती बाबत प्रचार- प्रसार केला जाणार आहे. 


      तसेच जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति माणसी ५५ लीटर पाण्याचे नियोजन केले जात आहे,याबाबतची माहिती आणि मार्गदर्शन स्वच्छता रथातून करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments