एमजी मोटर ईव्ही कंपोनंट उद्योगा मधील कौशल्य विकासाला चालना देणार

ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियासोबत सहयोग केला ~


मुंबई, १२ जानेवारी २०२२: एमजी मोटर इंडियाने ईव्ही कंपोनंट उद्योगामधील कौशल्य विकासाबाबत माहिती देण्यासोबत चालना देण्याच्या दृष्टिकोनासह ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसीएमए) सोबत सहयोग केला आहे.


      एसीएमए कंपोनंट विभागामधील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी झेडएस ईव्हीचा अभ्यास करेल. तसेच ईव्ही परिसंस्थेच्या विकासाला पाठिंबा देण्याच्या सहयोगाच्या उद्देशाशी बांधील राहिल. ते सोनिपतच्या आयआयटी दिल्ली कॅम्पससोबत सहयोगाने काम करत शहरी भारतामध्‍ये इलेक्ट्रिक वाहनांच्या अंमलबजावणीसंदर्भात संशोधन करतील.


      एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, "एमजी मोटर व एसीएमए सहयोगाने भविष्‍यासाठी सुसज्ज कर्मचारीवर्ग निर्माण करण्याकरिता माहिती व कौशल्य विकासाला चालना देत ईव्ही कंपोनंट उद्योगामध्ये मूल्याची भर करतील. हा सहयोग ईव्ही परिसंस्था प्रबळ करण्याकरिता सीएएसई मोबिलिटी, माहिती व कौशल्य विकास आणि एकूण कटिबद्धता या एमजीच्या दृष्टिकोनाशी देखील संलग्न आहे."


         एसीएमएचे अध्यक्ष संजय जे कपूर म्हणाले, "आम्हाला ही संधी देण्यासाठी आम्ही एमजी मोटरचे आभार मानतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकरिता भविष्यासाठी सुसज्ज कर्मचारीवर्ग काळाची गरज आहे आणि हा सहयोग ऑटो कंपोनंट उत्पादकांना त्यांची कौशल्ये वाढवण्यामध्ये व काळाशी संलग्न राहण्यामध्ये मदत करेल."


        हा सहयोग इलेक्ट्रिक वाहनासाठी परिसंस्था विकसित करण्यासोबत पाठिंबा देण्याच्या एमजीच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे. एमजीने याच संशोधनासाठी आयआयटी दिल्ली - सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह रिसर्च अॅण्ड ट्रायबोलॉजी (सीएआरटी) सोबत सहयोग केला होता.

Post a Comment

0 Comments