प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा ,विद्रुप मृतदेहाच्या शर्टावरील टेलर मार्क ने भिवंडी ग्रामीण पोलिसांनी लावला छडा..भिवंडी दि 8 (प्रतिनिधी ) प्रेम आंधळा असते प्रेमळ वय नसतं हे सांगितले जाते ते खरे वाटावे असेच काही भिवंडी शहरात घडलेल्या हत्या प्रकरणातून उघडकीस आले आहे .एक चार मुलांच्या आईने आपल्या पेक्षा सहा वर्षाने छोट्या असलेल्या आपल्या प्रियकर सोबतच्या प्रेमात पती अडथळा ठरत असल्याने गावठी औषध घेण्याच्या उद्देशाने आडवाटेच्या जंगलात नेऊन त्याची हत्या करून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप केला परंतु चाणाक्ष पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टा वरून मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या पत्नी सह प्रियकराच्या मुसक्या अवळल्या  आहेत.

 
          भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत 4 जानेवारी रोजी खारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील जंगलात एक व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली होती .घटनेचे गांभीर्य पाहता मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसां समोर असताना पोलिस उपअधीक्षक विकास नाईक यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतला. मृतदेहाच्या शर्टावरील आयान फॉर मेन्स टेलर्स हा मार्कां आढळून आला असता पोलिसांनी भिवंडीत या नावाने टेलर्स दुकानाचा शोध घेतला असता बागे फिरदोस येथे सदर दुकान आढळून आले. 


            त्याच्या मदतीने शर्टाची व त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. तो मृतदेह सलाउद्दीन मोहम्मद युसूफ,वय 42 विठ्ठल नगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. तेथे जाऊन पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबियांचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांना कडून माहिती घेतली असता त्याच इमारती मधील असजद अन्सारी वय 32 ही व्यक्ती दफनविधी प्रसंगी हजर नव्हता ही बाब समोर आली असता त्याचा शोध घेतला असता तो पसार झाला होता पोलिसांनी त्याला नारपोली परिसरातून अटक करीत विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली .


        असजद अन्सारी वय 32 या विवाहित व्यक्तीचे मयत व्यक्तीच्या 38 वर्षीय पत्नी सोबत मागील सहा महिन्यां पासून अनैतिक संबंध होते.त्यामध्ये पतीचा अडसर ठरत असल्याने पत्नी व प्रियकराने मिळून कट रचला मयत पती यास लघवीचा त्रास होत असल्याने खारबाव येथील ग्रामीण भागात त्यावर गावठी औषध मिळते ते घेण्यासाठी त्यास पत्नीने गळ घातली व त्यासाठी दोघे गेले असता त्या ठिकाणी आधीच येऊन थांबलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करीत मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तोंडावर दगड आपटून चेहरा विद्रुप केला होता.


        परंतु भिवंडी तालुका पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस पथकाने कसून तपास करीत अवघ्या दोन दिवसात आरोपी पत्नी व प्रियकरास अटक केली असून न्यायालयाने त्यांना 14 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे .

Post a Comment

0 Comments