भिवंडी नजीक खोणी येथे इमारतीची गॅलरी कोसळून एक पादचारी ठार..


भिवंडी दि 4 (प्रतिनिधी ) शहरा नजीक असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार येथील एका इमारतीची रस्त्याच्या बाजूने असलेली गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एक पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
खाडीपार येथे एक एक दोन मजली इमारत असून त्याच्या तळमजल्यावर सागर किनारा हॉटेल आहे .


         तर त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हॉटेल मधील कामगार राहत असून मंगळवारी दुपारच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीचा रस्त्याच्या बाजूने असलेला सज्जा अचानक कोसळला त्याच सुमारास मूळ जव्हार येथील परंतु भिक्षा मागून चरितार्थ चालविण्यासाठी येथील आदिवासी पाड्यावर राहत असलेला शीडा दादू पढेर वय 72 हा भिक्षेकरी त्याच सुमारास त्या ठिकाणा हुन जात असताना त्याच्या डोक्यावर गॅलरीचा ढिगारा पडल्याने वृद्ध भिकाऱ्याचा रक्तस्त्राव झाल्याने जागेवरच गतप्राण झाला. या घटने नंतर स्थानिक निजामपुरा पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी हॉटेल इमारत मालक शादाब हनी या विरोधात कारवाई सुरू केली आहे .

Post a Comment

0 Comments