आणि त्याला आत्महत्ये पासून परावृत्त केले


कल्याण, कुणाल म्हात्रे  : कोरोनाकाळात नोकरी गेल्याने कुटुंबाचा डोलारा कसा सावरणार या अर्थिक विवेचनेत सापडलेल्या  शहाड परिसरातील एका ३५ वर्षीय इसमाने टोकचा निर्णय घेत आत्महत्या करण्याचा टोकचा निर्णय घेत    विद्युत ट्रान्सफॉर्मर युनिट  गाठत स्वतःला चिटकवून घेत आत्महत्या करीत असल्याचा प्रकार घडणार सुदैवाने खडकपाडा पोलीस स्टेशनच्या गस्ती पथकाच्या दक्षतामुळे आत्महत्येपासून परावृत्त केले. "खाकी वर्दीतील  देवदूतामुळे इसमाच्या संभाव्य आत्महत्येमुळे एक उघड्यावर पडणारा संसार सावरला".                

                 


        मंगळवारी मध्य रात्री सुमारे साडे बारा एकच्या दरम्यान शहाड येथील बँक ऑफ इंडियाच्या बाजूला  विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ एक ३५ वर्षीय इसम पोलिसांचे रात्रीचे गस्त पथक फिरत असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश यशवंतराव व पोलीस नाईक धूळखंड व बांगर यांच्या नजरेत आले असता त्यांनी त्याला हटकले. मी विद्युत ट्रांसफार्मर जवळ आत्महत्या करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक अडचणींमुळे कौटुंबिक जबाबदारी आपण पार पाडू शकत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने काही अंतरावरुन पोलिसांना सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश  यशवंतराव यांनी समयसूचकता दाखवित आपण तुला सर्व मदत करू तुझी अडीअडचण सोडवू अशा प्रकारे त्याला बोलण्यात गुंतवून आपल्या सहकाऱ्यासोबत त्याच्यावर प्रेमाची झडप घालून ताब्यात घेतले. आत्महत्या करणाऱ्या ३५ वर्षीय इसमाचे समोपदेशन करीत त्यास आत्महत्या करण्यापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश यशवंतराव यांनी परावृत्त करीत त्याला त्याच्या राहत्या घरी घेऊन जात कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या इसमाला परावृत्त केल्याने यशवंतराव यांचे विशेष कौतुक केले जात आहे. मुंबई येथे कार्यरत असताना सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकणार्या चा तातडीने शोध घेत समोपदेशन करीत त्यांनी दोघांना आत्महत्येपासून परावृत्त केले. अशा पोलीस दलातील देवदुताच्या कामगिरीला सलाम.

Post a Comment

0 Comments