कल्याण ग्रामीण मधील विद्यार्थ्यांच्या लसीकरणा साठी कुणाल पाटील फाउंडेशनचा पुढाकार


कल्याण : कोरोना काळात सुरवातीपासूनच मदत कार्यात अग्रेसर असणाऱ्या कल्याण मधील कुणाल पाटील फाउंडेशनने कल्याण ग्रामीण मधील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी देखील पुढाकार घेतला आहे.  


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असताना १५ ते १८  वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला देखील सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे लसीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र कल्याण ग्रामीण मधील विद्यार्थी या लसीकरणापासून वंचित आहेत.


 ही बाब येथील पालकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या लक्षात आणून दिली असतात्यांनी लागलीच यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत कल्याण ग्रामीण मधील गायत्री विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी  लसीकरण केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी गायत्री विद्यालय नीलम शाळेसह इतर शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.


 आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कल्याण ग्रामीण मधील नागरिकांचे लसीकरण कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून कल्याण ग्रामीण मधील १५  ते १८  वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण कसे होईल याचा प्रयत्न कुणाल पाटील फाउंडेशन करणार आहे. कोणीही या लसीकरणा पासून वंचित राहू नये असे आवाहन नगरसेवक कुणाल पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments