भिवंडीत बूस्टर डोस देण्यास सुरुवात...शहरात लसीकरण वाढविणे गरजेचे ...आयुक्त सुधाकर देशमुखभिवंडी दि 10(प्रतिनिधी ) देशात आणि राज्यात आरोग्य कर्मचारी ,फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यासाठी तिसरा बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली असून भिवंडी पालिका क्षेत्रात पालिका कर्मचारी यांच्यासाठी विशेष केंद्र पालिका मुख्यालयात सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी आयुक्त सुधाकर देशमुख ,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ के आर खरात ,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी सर्वप्रथम बूस्टर डोस घेऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला .


         लसीकरण झालेल्या व्यक्तींना कोरोना लागण झाल्यास लक्षणे कमी आढळून येत असून सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णां पैकी 96 टक्के रुग्ण हे लसीकरण न झालेले आढळून येत असल्याने सर्व नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी करीत भिवंडी पालिका क्षेत्रात इतर शहरांच्या तुलनेत लसीकरण कमी असून ती चिंतेची बाब आहे त्यामुळे नागरीकांनी अफवां वर विश्वास न ठेवता लसीकरणा करून घ्यावे जेणे करून आपला व कुटुंबीयांचा जीव धोक्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन शेवटी केले.

Post a Comment

0 Comments