राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत एस.एस.टी. महाविद्यालयातील खेळाडुंचे यश


कल्याण : मलकापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुमारी गट बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कल्याण डोंबीवली महानगर पालिका मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. यामध्ये एस.एस.टी. महाविदयालयातील एकूण ८ खेळाडुंचा संघात समावेश होता. यातील सर्व खेळाडुंनी  बहारदार खेळ करत स्पर्धेच्या सुरवातीपासुनच सर्व संघावर मात करत आपल्या उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले होते. पण पुणे जिल्ह्य संघासोबत झालेल्या अत्यंत अतितटीच्या सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध करु शकले नाही.


यामध्ये कप्तान दिपाली धुळे,  आरती यादव,  रेणुका खनाल आणि भारती सोनी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीपण आपल्या संघाला पराभवापासुन वाचवु शकले नाही. त्याचप्रमाणे सुमन रॉयअस्मिता साळवेकल्पना वर्मा आणि भाविका चव्हाण यांची सुद्धा संघाला मदत मिळाली. गेली दोन वर्ष सर्व  खेळाडू स्पर्धेला मुकले होते. पण अत्यंत आनंदात  सुरवात झालेल्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.


कल्याण डोंबीवली महानगर पालिका बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पोटे आणि सहसचिव लीना कांबळे यांनी सर्व खेळाडुंचे अभिनंदन केले. तसेच एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानीउपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानीउपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवारमहाविद्यालयाचे मार्गदर्शक दिपक खरात,  सरथ पिल्लेसचिन कालिकलभावना खरात आणि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे हरीश सत्पती यां सर्वांनी सुद्धा  विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments