गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते फुटबॉल टफै उद्घाटन


कळवा , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र शूटिंग बॉल चे अध्यक्ष क्रीडाप्रेमी माजी महापौर मनोहर साळवी यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक नगरसेविका अपर्णा साळवी यांच्या पाठपुराव्यामुळे कळवा सायबा क्रीडानगरी मनिषा नगर प्रभाग क्रमांक 23 येथे खेळाडूंसाठी फुटबॉल टफै चे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते दिः23/1/2022 रोजी करण्यात आले.


           त्याप्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे माजी महापौर ज्येष्ठ नेते मनोहर साळवी माजी विरोधी पक्ष नेता मिलिंद पाटील माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिलाताई केणी ठाणे महानगरपालिका विरोधी पक्ष नेता शानू पठाण कळवा प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका वर्षा मोरे नगरसेविका आरती गायकवाड नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका मनाली पाटील माजी नगरसेवक मिलिंद साळवी परिवहन सदस्य प्रकाश पाटील राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष सुरेखा पाटील तसेच या भागातील खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


         या उद्घाटन प्रसंगी जितेंद्र आव्हाड म्हणाले की कळवा परिसरातील तरुणांसाठी फुटबॉल प्रशिक्षण घेण्यासाठी शहरातून बाहेर जावे लागते या परिसरात खेळाडूंना फुटबाल प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेविका अपर्णा साळवी यांनी ठाणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या सभेमध्ये ठराव मंजूर करून कळवा येथील मनिषा नगर परिसरात फुटबॉल चे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना फुटबॉल टफै उपलब्ध करून देण्यात आले.


          यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना फुटबॉल खेळण्याचा मोह मोर्चा आला नाही आणि त्यांनी सुद्धा खेळाडूंसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला प्रत्येक नगरसेवकाने अशाप्रकारे आपल्या प्रभागात मैदान किंवा टफै साठी जागा खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली तर तरुण पिढी ही इतर ठिकाणी वेळ न घालवता खेळात त्यांची आवड वाढेल भविष्यात आणखी एक मैदान लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments